21 C
Pune
Wednesday, December 25, 2024
Homeशैक्षणिक*महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड आयआयबी चा नीट २०२३ मध्ये महानिकाल !!*

*महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड आयआयबी चा नीट २०२३ मध्ये महानिकाल !!*

महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड आयआयबी चा नीट २०२३ मध्ये महानिकाल !!

फिजिक्स मध्ये ६, केमिस्ट्रि मध्ये २ तर बायोलॉजी मध्ये ५ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण !

तसेच तब्बल ७ विद्यार्थ्यांना ७०० पेक्षा अधिक गुण ..

नांदेड (प्रतिनिधी) दि. 15 जुन 2023

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (नीट-यूजी) निकाल राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) मंगळवारी रात्री १३ जून २०२३ रोजी प्रसिद्ध केला. त्यात आयआयबी ने आपल्या गुणवत्तापूर्ण वाटचालीत आणखी एक पाऊल पुढे टाकतांना नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे, यावर्षीच्या निकालात आयआयबीच्या पलक जाजू ,सायली महींद्रकर, व पलक शहा यांनी ७२० पैकी (७०५) गुण मिळवत नीट म्हणजेच आयआयबी असे समीकरण आणखी बळकट केले आहे. सर्वोच्च निकालाच्या बळावर नीट साठी आयआयबी पॅटर्न हा याही वर्षी संपूर्ण राज्यात हिट ठरला आहे.

नीट २०२३ च्या निकालात आयआयबी च्या पलक जाजू, सायली महिंद्रकर व पलक शहा या विद्यार्थिनीनी ७२० गुणापैकी (७०५), गुण प्राप्त करत सर्वोत्तम स्थान प्राप्त केले तर शिवम माहूरे, ज्ञानेश्वर जाधव, साक्षी वजिरगावे, अर्जुन लिगंदळे या ०४ विद्यार्थ्यानी ७२० पैकी ७०० गुण प्राप्त करत विक्रम प्रस्थापित केला. त्यासोबतच उझेर रुलानी याने ६९७ तर भारती देशमुख व अनुष्का भारसवाडकर यांनी ७२० पैकी ६९६ गुण प्राप्त करत घवघवीत यश मिळविले आहे .

यासोबतच आयआयबीने विषयावार गुण प्राप्तीमध्येही गगनभरारी घेतली आहे. यामध्ये फिजिक्स विषयात १८० पैकी १८० गुण घेणारे एकुण ०६ विद्यार्थी आहेत. यात पलक जाजू, सर्वेश हटकर, उझेर रुलानी, रामप्रसाद पाटिल, सायली कदम, हफिज सोहेल यांचा समावेश आहे. तर बायोलॉजी या विषयात ३६० पैकी ३६० गुण घेणारे एकुण ०५ विद्यार्थी आहेत. यात ज्ञानेश्वर जाधव, भारती देशमुख, अक्षय मिसाळ, शिवाणी जाधव, गणराज नल्लावार यांचा समावेश आहे. तसेच केमेस्ट्री या विषयात १८० पैकी १८० गुण १८० गुण प्राप्त करणारे एकुण ०२ विद्यार्थी आहेत. यामध्ये सायली महिंद्रकर व तेजस पोरे या दोघांचा समावेश आहे.

हे सर्व यश विधार्थ्यांनी आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, प्रयत्नांतील सातत्य, शिक्षकांचे सर्वोत्तम मार्गदर्शन व या सर्व बाबीनां नियोजनबध्द करण्यासाठी व्यवस्थापनाने केलेले प्रयत्न यातून प्राप्त झाले आहे.

नीट’साठी आयआयबीचा “नीट मंत्रा, तडका, बायोपंच” ठरला मास्टर स्ट्रोक…

नीट’साठी आयआयबीचा “नीट मंत्रा, तडका, बायोपंच” ठरला मास्टर स्ट्रोक… आयआयबीने विद्यार्थ्यांना कणखर बनविण्यासाठी फिजिक्स , केमिस्ट्री व बायोलॉजी साठी नीट मंत्रा , ‘नीट’ रँक बूस्टर – ऑरगॅनिक तडका , ‘नीट’ चॅलेजंर , ‘नीट’ मंत्रा, ,एक दिवा ज्ञानार्जनाचा – दिवाळी धमाका, बायोपंच मध्ये पाच वेगवेगळे एडिशन तयार केले होते, असे एका पेक्षा एक सरस प्रोगाम राबविले त्यामुळे विद्यार्थ्यांना ४०,००० पेक्षा जास्त प्रश्‍नांचा सराव करता आला आणि त्याच बरोबर याठिकाणी घेण्यात आलेली प्रत्येक सराव परिक्षा ही मुख्य ‘नीट’ परिक्षेच्या धर्तीवर घेण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढला आणि त्याबळावर विद्यार्थ्यांनी ‘नीट’ चा टप्पा यशस्वीपणे पेलला असे मत या ऐतिहासिक निकालावर प्रतिक्रीया देतांना आयआयबी चे मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यांनी व्यक्त केली ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]