20.3 C
Pune
Saturday, January 11, 2025
Homeराष्ट्रीय*घनसरगाव येथील भाजपाचा लाभार्थी संवाद कार्यक्रम*

*घनसरगाव येथील भाजपाचा लाभार्थी संवाद कार्यक्रम*

नरेंद्रजी मोदी यांनी विकासापासून कोसोदूर असलेल्‍यांना विकासाच्‍या प्रवाहात आणले

घनसरगाव येथील भाजपाच्‍या लाभार्थी संवाद कार्यक्रमात माजी मुख्‍यमंत्री तीरथसिंह रावत

             लातूर दि.१२– खोटी आश्‍वासने आणि भूलथापा देवून स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ देशाची सत्ता काँग्रेसने उपभोगली. मात्र विकासाचे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी साठ वर्षात कॉग्रेसला जे जमले नाही ते अवघ्या नऊ वर्षात करून दाखविले. विकासापासून कोसोदूर असलेल्‍या नागरीकांना विकासाच्‍या प्रवाहात आणण्‍याचे काम केले, गोरगरीब सर्वसामान्य माणसाला दिलासा देणाऱ्या अनेक योजना सुरू केल्या. हर दर्द की दवा मोदी है… प्रत्‍येक प्रश्‍नाची सोडवणूक केवळ नरेंद्रजी मोदी हेच करू शकतात, देशवासियांच्‍या मनात आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍याचे काम त्‍यांनी केले असून समृध्‍द भारत निर्माण करण्याच्‍या त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना आपण साथ द्यावी असे आवाहन उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री खासदार तीरथ सिंह रावत यांनी घनसरगाव येथे बोलताना केले.

           भाजपाच्या जनसंपर्क अभियाना अंतर्गत रेणापूर तालुक्यातील मौजे घनसरगाव येथे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री खा. तीरथसिंह रावत, मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष खा. विनोदजी गोटिया यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थी संवाद कार्यक्रम रविवारी सायंकाळी संपन्न झाला. याप्रसंगी जिल्ह्याचे खा. सुधाकर शृंगारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, लातूर जिल्हा प्रभारी प्रा. किरण पाटील, लोकसभा प्रचार प्रमुख दिलीपराव देशमुख, माजी खासदार सुनील गायकवाड, जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, भागवत सोट, रोहिदास वाघमारे, तालूकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, संगायो समितीचे अध्यक्ष वसंत करमुडे घनसरगाव येथील सरपंच महानंदा शरद दरेकर यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास महिला, पुरूष विविध योजनेतील लाभार्थी मोठया संख्‍येनी उपस्थित होते. 

         यावेळी बोलताना खा. तीरथसिंह रावत म्हणाले की, कारोना काळात सर्वजण घरात होते, उद्योग, रोजगार बंद असल्‍याने कोणावरही उपासमारीची पाळी येणार नाही याची जाणीव लक्षात घेवून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील १३० कोटी जनतेला राशनसह विविध प्रकारची मदत करण्‍याचे काम केले. राम मंदिर, कलम ३७० यासह अनेक एैतिहासिक निर्णय घेतले असून त्‍यांचा जगभरात जयजयकार होत आहे. आज देशाचे नेतृत्‍व करणारे मोदीजी येत्‍या काळात विश्‍वाचे नेतृत्‍व निश्चितच करतील असा आत्‍मविश्‍वास त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. 

काँग्रेसच्‍या काळात मजबुरीने, मात्र भाजपाच्‍या काळात मजबुतीने नागरीक जीवन जगत आहेत. देशातील जनतेचे जीवनमान उंचावण्‍याचे आणि त्‍यांची आर्थिक क्षमता वाढविण्‍याचे काम नरेंद्रजी मोदी करत आहेत. सामान्‍या माणसाला केंद्रबिंदू माणून सुरू केलेल्‍या योजना जात, धर्म, पक्ष, गाव असा कोणताही भेदभाव न करता गरजूंना त्‍याचा लाभ मिळावा यासाठी मोदी सरकार कार्यरत आहे असे सांगून खा. विनोदजी गोटीया म्‍हणाले की, आपल्‍या सर्वांसाठी मोदींनी अनेक कामे केली आता आपण सर्वांनी मोदींना समर्थन देण्‍याचे काम करावे. समाजाच्‍या हितासाठी आणि त्‍यांच्‍या प्रश्‍नांची सोडवणूक करण्‍यासाठी भाजपाचे कार्यकर्ते सज्‍ज असतात त्‍यांचे ते कर्तव्‍य आहे. सबका विश्‍वास, सबका विकास, सबका प्रयास यासाठीच भाजपा काम करत आहे. 

केंद्र आणि राज्‍य डबल इंजिन सरकारच्‍या  माध्‍यमातून ज्‍याला खरी गरज आहे त्‍याला न्‍याय देण्‍याचे काम केले जात आहे. जे स्‍वप्‍न पाहीले होते ते प्रत्‍यक्षात उतरविण्‍याचे काम होत असून नरेंद्रजी मोदी हेच पंतप्रधान असले पाहीजेत हीच बहूतांशी देशवाशीयांची भावना आहे. केंद्र शासनाच्‍या माध्‍यमातून जिल्‍हयात हजारो कोटींची शेकडो किलोमिटर सिमेंट रस्‍ते झाली. रेल्‍वे डब्‍बे निर्मितीचा महत्‍वपुर्ण प्रकल्‍प लातूरात कार्यान्‍वीत झाला. गरजूंना घरकुल, गॅस, किसान पेन्शन, मोफत राशन, आरोग्य सुविधा यासह विविध योजनेचा लाभ मिळाला असल्‍याचे सांगून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, आजपर्यंत घनसरगाव या गावासाठी जी जी विकासाची कामे मंजूर करता येतील ती सर्व कामे करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. यापुढील काळातही गावच्‍या विकासाला निधी कमी पडू देणार नाही असे बोलून दाखविले. 

यावेळी दिलीपराव देशमुख, अॅड. दशरथ सरवदे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करून केंद्र शासनाच्‍या  विविध योजनांची माहिती दिली. प्रारंभी सरपंच महानंदा शरद दरेकर यांनी केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या  माध्‍यमातून घनसरगाव येथे राबविलेल्‍या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी निवृत्‍ती जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

          यावेळी उपसरपंच विमलबाई भरत कापसे, अशोकराव शिंदे, राम आडसुळे, प्रविण शिंदे, सुरेंद्र गोडभरले, श्रीकृष्ण मोटेगावकर, चंद्रकांत कातळे, माजी नगराध्यक्ष आरती राठोड, ललिता कांबळे, शिला आचार्य, उत्तम चव्हाण, सुनील चेवले, श्रीकृष्ण पवार, सिद्धेश्वर मामडगे, रमा चव्हाण, सुरेश बुडडे, रमा फुलारी, शालिक गोडभरले, नानासाहेब कसपटे, सचिन शिंदे, विलास आमनावर, शफू शेख, अॅड. एन.बी. जाधव, सुरेश जाधव, विश्‍वनाथ गाडे, राहूल दरेकर, ज्ञानेश्‍वर पवार, भारत शिंदे, विजय चव्हाण, उज्वल कांबळे, गुणवंत सुर्यवंशी, ओम मोटे, रामेश्‍वर सुर्यंवशी, गंगाधर शिंदे, निलेश कापसे, माधव कांबळे, ज्ञानेश्‍वर आगलावे, शेख जलील, श्रीमंत नागरगोजे, राजकुमार मानमोडे, विपुल चेपट यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]