38 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*भारतीय जैन संघटनेच्या जनजागृती मोहिमेस प्रतिसाद*

*भारतीय जैन संघटनेच्या जनजागृती मोहिमेस प्रतिसाद*

२२दिवसात १५३ साठवण तलावातील गावांना भेटी
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची जनजागृती

लातूर , दि. २९ ( प्रतिनिधी ) –गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत भारतीय जैन संघटना , केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासनाच्या वतीने मिशन जलपर्याप्त जिल्हे ही योजना राबविण्यात येत आहे . या अनुषंगाने बीजेएस गावोगाव मध्ये जाऊन जनजागृती करीत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत २२ दिवसात १५३ साठवण तलावातील गावांना भेटी दिल्या आहेत व जनजागृती केली गेली आहे, अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय शहा यांनी दिली .
भारतीय जन संघटनेच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून गावोगावी जाऊन प्रचार रथाच्या माध्यमातून मोहिमेचा प्रचार , प्रसार करण्यात येत आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती व महत्त्व गावकऱ्यांना , शेतकऱ्यांना व्यक्तीच्या भेटून देण्यात येत आहे. तसेच भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी त्याबाबत पत्रके वाटून जनजागृती मोहीम राबवीत आहेत. या मोहिमे अंतर्गत आतापर्यंत २२ दिवसात एकूण १५३ गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या गेल्या आहेत. ग्रामपंचायत कार्यालय मार्फत मागणी अर्जही भरून घेण्यात आले आहेत . या महत्त्वाकांक्षी योजनेची योग्यअंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. हे सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत .


या योजनेअंतर्गत अहमदपूर , चाकूर, उदगीर ,जळकोट ,देवणी या तालुक्यासाठी एक प्रचाररथ साठवण तलावास भेट देत आहे व दुसरा प्रचार रथ लातूर , औसा, रेणापूर, निलंगा व लातूर ग्रामीण भागातील साठवण तलाव गावांना भेट देऊन गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेची माहिती देत आहे. या कामी जिल्हाधिकारी महोदय बारकाईने लक्ष देत असून, जलसंधारण विभागाचे नोडल अधिकारी संजय नाईक यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.

या जनजागृती मोहिमेअंतर्गत १५३ गाव साठवण तलावात भेट देण्यात आली असून मागणी पत्रके भरून घेण्यात आली आहेत .त्यापैकी 42 गावातील तलावामध्ये पाणी नव्हते असे या दरम्यान आढळून आले आहे. अनेक गावांमध्ये तलावात पाणी असून गाळ काढण्यासाठी उशीर होत आहे तरी जास्तीत जास्त साठवण तलावातील गावांना भेट भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी भेट देणार असून लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हा प्रचार रथ जनजागृती करणार आहे. या या कामासाठी भारतीय जैन संघटनेचे अशोक वणवे (9420388202 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण १२५०० घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असून साधारण ४०० एकर क्षेत्रावर तो पसरविण्यात आला आहे ,अशी माहिती अभय शहा यांनी दिली.या मोहिमेत इतर स्वयंसेवी संघटना उदासीन दिसत आहे. एनजीओ चा पाहिजे तसा सहभाग नसल्याने कामास विलंब होत आहे , अशी खंत अभय शहा यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या मानाने लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक गावात बीजेएस चा प्रचार रथ पोहोचला आहे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]