माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या
७८ व्या जयंतीनिमीत्त विलासबाग, बाभळगाव येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन
लातूर प्रतिनिधी : गुरूवार २५ मे २०२३
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव
देशमुख यांच्या ७८ जयंतीनिमित्त शुक्रवार दि. २६, मे २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता विलासबाग, बाभळगाव येथे सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री म्हणून आदरणीय
विलासरावजी देशमुख साहेब यांची सामान्याशी बांधीलकीची भावना होती.मराठवाडयातील विशेषता लातूर जिल्हा हा मागासलेला होता, पण एक चांगली वैचारीक चळवळीची परंपरा लाभलेला हा भाग होता. विविध जातीधर्माचेलोकगुण्यागोविंदाने राहत होते. एक चांगली सामाजिक सलोख्याची परंपरा येथे आहे. ही विचारधारा येथील प्रगतीला पोषक ठरली. लातूर जिल्हा झाल्यानंतर विलासरावजी देशमुख यांचे नेतृत्व लाभले, यामूळे येथे सहकार, कृषि,शिक्षण, उद्योग, व्यवसाय, व्यापारासचालनामिळाली,लातूरचीप्रगतीसर्वक्षेत्रातझाली.याकाळातमिळालेल्यासत्तेचावापरविलासरावजींनीलोककल्याणासाठकेला.
अशा लोकविलक्षण अष्टपैलू नेतृत्वाच्या ७८ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दि.२६, मे २०२३ बाभळगाव येथील विलासबाग येथे आदरांजली वाहण्यासाठी प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी सकाळी सर्वांनी८.४५ वाजताविलासबाग येथे स्थानापन्न व्हावे अशी अपेक्षा आहे. सकाळी ९.०० वाजतामहाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मयूर उमेश सुकाळे व त्यांच्यासहकाऱ्यांकडून शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भावदर्पण हा कार्यक्रमसादर करण्यात येणार आहे. उपस्थित सर्वांनी पुष्पांजली अर्पण केल्यानंतर
१०.०० वाजता आदरांजली सभेचा समारोप होईल. या सभेचेसुत्रसंचालन गोंविदकेंद्रे करणार आहेत. या आदरांजलीकार्यक्रमास विलासबाग, बाभळगाव येथे
जनतेने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनदेशमुखकुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे
———————–