कथा केरळची…
व्यथा हिंदू समाजाची!
( महेश काळे)
ही कथा आहे केरळसारख्या देवभूमीत चालू असलेल्या एका छुप्या धर्मयुद्धाची… हिंदू मुलींना प्रेमजालात ओढून त्यांचे शारीरिक शोषण आणि नंतर धर्मांतर करण्यासाठी सक्रिय असलेल्या एका प्रचंड अशा जिःादी इकोसिस्टीमची आणि त्याही पुढे जाऊन साऱ्या जगाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरलेल्या आयसीस सारख्या इसलामी दहशतवादी संघटनेला आवश्यक असणाऱ्या सेक्स वर्कर किंवा आत्मघातकी पथकांसाठी लागणाऱ्या महिलांना छळ कपटाने सीरियासारख्या देशात पाठविण्यासाठी चालू असलेल्या एका व्यापक अशा आंतरराष्ट्रीय कटाची…!
#’ द केरल स्टोरी’ ही खरे तर शालिनी उन्नीकृष्णन या अत्यंत संस्कारी आणि धार्मिक वातावरणात वाढलेल्या एका कॉलेज युवती व तिच्या तीन मैत्रिणींची कथा. शालिनीच्या या तिघी मैत्रिणी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माच्या. आपले घर, गाव सोडून उच्च शिक्षणासाठी कॉलेजमध्ये आल्यानंतर धमाल करण्याच्या मनस्थितीत असणाऱ्या या तिघी मैत्रिणी कशा एका जिहादी षडयंत्राला बळी पडतात याची ही सत्य घटनांवर आधारित अशी कथा आहे.
कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासून प्रामुख्याने हिंदू मुलींच्या शोधात असलेली ही इकोसिस्टम या तिघींवर पहिल्या दिवसापासून आपले लक्ष केंद्रित करते. या तिघींना धर्मांतरित करण्यासाठी जे वेगवेगळे हातखंडे वापरले जातात ते या चित्रपटात बारकाईने दाखवण्यात आलेले आहेत. या तिघींची असलेली रूममेट हीच या सगळ्या षडयंत्राचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे हे या तिघींच्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. होस्टेलमध्ये असताना कट्टरपणे आपल्या धर्माचे पालन करणारी शालिनीची शांतिप्रिय मैत्रीण हिंदू परंपरा, सण, देव – देवता याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून हिंदू मुलींना कसे निरुत्तर करते आणि अल्लाह हाच कसा सर्वोच्च आहे हे या तिघींना पटवून देत त्यांचे कशा पद्धतीने ब्रेनवाश करते हे दाखवणारा हा चित्रपट.
या चित्रपटात या इकोसिस्टमची जी मोडसऑपरेंडी दाखवली आहे, ती देशभरात जवळपास सर्व ठिकाणी वापरली जाते. हिंदू मुलींशी ओळख करणे, त्यांना हळूहळू आपल्या घरी घेऊन जाणे, सणाच्या दिवशी आमंत्रित करणे, जाकिर नाईकसारख्या दहशतवादी विचारांच्या वक्त्यांची सीडी देणे, कुराण व इतर साहित्य वाचण्यास देणे, आपल्या मुस्लिम मित्रांशी ओळख करून देणे, त्यांच्याशी मैत्री वाढवायला प्रवृत्त करणे, त्यातून मैत्री, जवळीक, शारीरिक संबंध, प्रेग्नेंसी, धर्मांतरासाठी दबाव आणि नंतर त्यांचे शारीरिक शोषण करून त्यांना सोडून देणे ही जवळपास सर्व ठिकाणची पद्धत या चित्रपटात देखील दाखवण्यात आली आहे. या तिघीपैकी ख्रिश्चन मैत्रीण ही आपल्या धर्ममताबद्दल कट्टर असल्याने ती यातून बाहेर पडते. दुसरी मैत्रीण गीतांजली ही या षडयंत्राला बळी पडते पण वेळीच सावध देखील होते, पण त्याआधी केलेल्या चुकांचे फोटो, व्हिडिओज तिचा मुसलियम मित्र सोशल मीडियावर व्हायरल करतो. त्याचा जबर धक्का बसून ती आत्महत्येचा मार्ग स्वीकारते.
मात्र या सर्वात अभागी ठरते ती शालिनी उन्नीकृष्णन,.. तिचा मुसलियम प्रियकर तिला प्रेग्नेंट करून सोडून देतो, मात्र मौलवीच्या सांगण्यावरून ती दुसऱ्या एका तरुणाशी निकाह करते आणि दोघेही सीरियाला जाऊन आयसिसमध्ये दाखल होण्याचे नक्की करतात. ती एका अर्थाने प्रशिक्षित दहशतवादी बनते. जाण्यापूर्वी तिला सर्वप्रथम हनिमूनच्या नावाखाली श्रीलंकेत नेले जाते. तिथे तिला तिच्या एका वर्ग मैत्रिणीचा फोन येतो, जिची ओळख याच शालिनीने एका मुस्लिम युवकाशी करून दिलेली असते. तो तिला गुंगीचे औषध देऊन केवळ स्वतःच नव्हे तर अनेकांकरवी कसे अत्याचार करवतो आणि यामागे ती शांतिप्रिय वर्गमैत्रीण कशी कारणीभूत आहे याची ती तिला माहिती देते. पण तोपर्यंत शालिनीचे परतीचे मार्ग बंद झालेले असतात.
प्रेम जालात अडकल्यापासून ते आयसिसच्या दुष्टचक्रात अडकण्यापर्यंतचा शालिनीचा प्रवास मन सुन्न करणारा आहे. कुठल्याही संवेदनशील व्यक्तीच्या हृदयाला खोलवर जखम करणारी शालिनीची ही कहाणी आहे. पशुंनाही लाजवेल अशा रानटी लोकांच्या कळपात अडकल्यानंतर शालिनीच्या नशिबी आलेल्या नरकयातना मनाला वेदना देणाऱ्या आहेत. अत्यंत धाडसाने या रानटी लोकांच्या तावडीतून सुटून शालिनी जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या कॅम्पमध्ये दाखल होते, तेव्हाच तिच्या नरकयातना संपुष्टात येतात. मात्र वर्षभर ती आयसिसच्या दहशतवाद्यासोबत राहिलेली असल्याने आणि तशा पद्धतीचे प्रशिक्षण घेतले असल्याने दहशतवादी म्हणून तिच्यावर बसलेला ठप्पा मात्र कायम असतो. या कॅम्पमधील चौकशी अधिकाऱ्यांसमोर शालिनीने सांगितलेली आपबीती म्हणजेच ‘ द केरल स्टोरी ‘ आहे. लव जिहाद सारखा एक गंभीर आणि चिंताजनक असा विषय एका मोठ्या पडद्याच्या माध्यमातून निर्मात्यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि धाडसाने समाजासमोर आणला आहे.
खरेतर ‘लव जिहाद’ हा विषय हिंदुत्ववादी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आक्रमकपणे मांडताना सारा देश बघतोय. मात्र हा एक काल्पनिक विषय असून संघ परिवाराचा केवळ एक प्रपोगंडा असल्याचा दूषप्रचार अनेक वामपंथी आणि जिहादी मानसिकतेच्या हिंदू विरोधी संघटनांनी आत्तापर्यंत केला आहे. मात्र हा प्रपोगंडा नसून जळजळते वास्तव असल्याचे हा चित्रपट आकडेवारी सह स्पष्टपणे दाखवतो. लव जिहाद म्हणजे केवळ हिंदू मुलींचे धर्मांतर करणे एवढेच मर्यादित नसून आयसिस साठी सेक्स वर्कर आणि आत्मघातकी बॉम्ब म्हणून त्यांचा उपयोग करण्याचे ते एक माध्यम असल्याचे हा चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येते. त्यामुळे हिंदू समाजाच्या दृष्टीने तर हा चिंतेचा विषय आहेच पण देशाच्या एकात्मता आणि अखंडतेसाठी देखील अत्यंत धोकादायक असे हे षडयंत्र आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे.
या चित्रपटात वेगवेगळ्या संवादांमधून काही धक्कादायक अशी आकडेवारी देखील मांडण्यात आलेली आहे. एकट्या केरळमध्ये ३२ हजार मुली गायब झाल्या असून त्यापैकी फक्त ७०० घटनांची नोंद पोलिसांकडे उपलब्ध आहे. त्यापैकी फक्त अडीचशेच्या आसपास मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. काही जिल्हे शांतीप्रिय झाल्यामुळे त्या गावांमध्ये शरीया लागू करण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. एका केरळ सारख्या छोट्या राज्यांमध्ये बदललेले धार्मिक असंतुलन चिंताजनक असेच आहे.
संयुक्त राष्ट्राच्या कॅम्पमध्ये दाखल होताना शालिनी स्वतःचा धर्म हिंदू असल्याची नोंद करते. मात्र हे शहाणपण येईपर्यंत तिला प्रचंड यातनांना सामोरे जावे लागलेले असते. तिचे आयुष्य जवळपास पूर्णपणे उध्वस्त झालेले असते. आजही दुर्दैवाने लव जिहादच्या प्रकरणात अडकलेल्या हजारो मुलींची हीच स्थिती आहे. ही सिस्टीम किती टोकाचे ब्रेन वॉश करते याची अनेक उदाहरणे चित्रपटात बघण्यास मिळतात. सुट्टीमध्ये घरी येताना हिजाब घालून येणे, प्रसाद घेण्यास नाकारणे, दवाखान्यात ऍडमिट असलेल्या वडिलांच्या चेहऱ्यावर ते काफीर असल्यामुळे थुंकणे असे हिंदू धर्माबद्दल मुलींना घृणा निर्माण व्हावी असे अनेक प्रसंग दाखवण्यात आले आहेत. आज सर्वच समाजचिंतकांना हा भेडसावणारा असा प्रश्न आहे की २० -२२ वर्ष घरात राहूनही अवघ्या काही दिवसांची ओळख असलेल्या मित्रावर विश्वास ठेवण्याची मानसिकता कशी निर्माण केली जाते. या प्रश्नाचे काही प्रमाणात या चित्रपटातून मिळते. विश्वास टाकण्याची आणि प्रभावित होण्याची सहज प्रवृत्ती काही प्रमाणात कारण असले तरी देखील आपल्या हिंदू धर्माबाबतची सजगता, अभिमान आणि श्रद्धा याचा कुठेतरी अभाव असल्यामुळे असे प्रकार घडतात असे लक्षात आले. ही बाब या चित्रपटात देखील दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील गीतांजलीचे वडील कट्टर कम्युनिस्ट असतात. त्यामुळे मोकळेपणाच्या स्वभावामुळे ती या इकोसिस्टीमच्या जाळ्यात जवळजवळ अडकते. तिला तिची चूक लक्षात येते. घरी आल्यानंतर आपल्या वडिलांना उद्देशून जे वाक्य ती बोलते त्यावर सर्वांनीच मनन करण्याची आवश्यकता आहे. ती म्हणते ‘ या चुकीला तुम्हीच जबाबदार आहात. तुम्ही कम्युनिस्ट विचारांबाबत मला सगळे सांगितले, पण आपला धर्म, संस्कृतीबद्दल काहीच माहिती दिली नाही.’
हा संवाद म्हणजे एका अर्थाने या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू समाजाला दिलेला सर्वात महत्त्वाचा संदेश आहे असे वाटते.
ही स्टोरी जरी केरळची असली तरी देखील एका अर्थाने देशाच्या अखंडतेपुढे असलेले हे सर्वात मोठे संकट आहे. केरळसारखी देवभूमी आज जिहादी शक्तींनी बसवलेल्या टाईम बॉम्बवर वसली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजात प्रचंड जागरणाची आवश्यकता आहे.
हे मात्र खरे आहे की हिंदू समाजाचा पहिला संघर्ष हा हिंदूंशीच होणार आहे! कारण दुर्दैवाने हिंदू समाजातील बऱ्याच मंडळींचा आजही असा समज आहे की, हा प्रश्न काल्पनिक आहे…
हा संघाचा प्रपोगंडा आहे !!
लेखन:महेश काळे