अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्यातर्फे रमजान ईदनिमित्त
हजार मुस्लीम बांधवांना शिरखूर्मा साहित्याचे वाटप
लातूर दि.21-04-2023
मुस्लीम धर्मीयांचा पवित्र सण म्हणून “रमजान ईद” या सणाकडे पाहिले जाते. या सणानिमित्त मुस्लीम बांधवांचा आनंद द्विगुणीत व्हावा. तसेच वाढत्या महागाईतही सर्वसामान्य मुस्लीम बांधवांनाही त्यांच्या सण आनंदाने साजरा करता यावा. यासाठी भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याकडून प्रभाग क्र.18 मध्ये हजार मुस्लीम बांधवांना शिरखूर्मा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
रमजान ईदनिमित्त मुस्लीम बांधव एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. परंतु कोरोणाचे संकट व वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुस्लीम बांधवांन सण साजरा करणेही अडचणीचे झाले आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन गोरगरीब कुटुंबातील मुस्लीम बांधवाना भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी प्रभाग क्र.18 मध्ये हजार शिरखूर्मा किटचे वाटप केले.
यावेळी जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, विश्वजितसिंह पाटील कव्हेकर, बालाजी शेळके, एम.एन.एस.बँकेचे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, सिध्देश्वर उकीरडे, जाफर पटेल, जावेद भाई, अब्दूल शेख, ताहेर शेख, सुलतान शेख, फैयाज शेख, तोसिफ पठाण, महेबूब शेख, बहेबूब बागवाण, माऊल पठाण, आकाश पिटले, अजय कोटलवार आदी उपस्थित होते.
भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सर्वसामान्य मुस्लीम बांधवांचा आनंद द्विगुणित झालेला आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून सुरू केलेल्या उपक्रमाचा आदर्श इतर लोकप्रतिनिधीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.