यात्रास्थळ, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची दुरुस्ती तसेच गावांतर्गत विकासाची होणार कामे….
औसा – आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणीवरून औसा मतदारसंघातील ९ यात्रास्थळांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २०२२-२३ अंतर्गत १ कोटी ३० लक्ष रुपये, मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र दुरुस्ती कामांसाठी ३.६६ कोटीं तसेच जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ अंतर्गत औसा मतदार संघातील गावांतर्गत रस्ते, दहनभूमी, दफनभूमी शेड संरक्षण भिंत बांधकाम, ग्रामपंचायत बांधकामासाठी १ कोटी ७० लक्ष,मतदारसंघातील ३६ तांडे/वस्त्यांवर अंतर्गत रस्ते निर्माण करण्यासाठी व सामाजिक सभागृह बांधकाम करण्यासाठी १.९४ कोटी रुपये निधी असा एकूण ८ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून देवी हल्लाळी येथील देवी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक रस्ता व संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, देवताळा देवी मंदिर परिसरात घाट बांधकाम व भक्त निवास बांधकाम करणे, किल्लारी येथील ईश्वर डोह पालखी रस्त्याचे खडीकरण, मजबुतीकरण काम व पुलाचे बांधकाम करणे, महादेववाडी येथील महादेव मंदिर रस्ता तयार करणे, मातोळा येथील खंडोबा मंडोरसमोर सभागृहाचे बांधकाम करणे, कासार सिरसी येथील मंदिराला जाणारा रस्ता तयार करणे, हासोरी येथे सभामंडप बांधकाम करणे तसेच मुदगड एकोजी येथील महादेव मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक रस्ता तयार करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत.तर वार्षिक योजना २०२२-२३ अंतर्गत औसा मतदारसंघातील हासेगाव, उस्तुरी व बोरफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जीर्ण इमारती पाडून नवीन इमारतींचे बांधकाम करण्यासाठी तसेच इतर २४ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे दुरुस्ती, कॅटल गार्डन बांधकाम करण्यासाठी ३ कोटी ६६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.तसेच जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ अंतर्गत औसा मतदारसंघातील गावांतर्गत रस्ते, दहनभूमी, दफनभूमी शेड, संरक्षण भिंत बांधकाम व ग्रामपंचायत बांधकाम इत्यादी २४ कामांसाठी १ कोटी ७० लक्ष व औसा मतदारसंघातील ३६ तांडे/वस्त्यांवर अंतर्गत रस्ते निर्माण करण्यासाठी व सामाजिक सभागृह बांधकाम करण्यासाठी १.९४ कोटी रुपये असा एकूण ८ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
………………………………………
मतदारसंघातील पायाभूत सुविधांसोबतच आरोग्य सुविधांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. औसा मतदारसंघातील विकासकामांसाठी जो निधी मिळत आहे ती केवळ सुरुवात आहे, आगामी काळात यापेक्षा अधिक निधी आणून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलू.
आमदार अभिमन्यू पवार.
…………………………………………………
आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जीर्ण इमारती पाडून नवीन इमारतींचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ८४ लाखांचा भरीव निधी उपलब्ध झाला असून यामाध्यमातून नागरिकांना पायाभूत आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.यासह आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने विविध विकासकामे करण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला असून या निधीतून मतदारसंघाचा कायापालट होईल.
भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता.
………..