‘
माध्यम वृत्तसेवा
पुणे ; दि.३( प्रतिनिधी )– लातूरचा सुपुत्र व सुप्रसिद्ध संगीतकार अभिजीत कवठाळकर यांनी संगीत दिग्दर्शित केलेला ‘ सर्किट ‘ हा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होतो आहे .मधुर भांडारकर आणि पराग मेहता प्रस्तुत ‘ सर्किट ‘ या चित्रपटास अभिजीतने संगीत दिलेले आहे. ही लातूरकरांसाठी खूप अभिमानाची बाब आहे .
स्वर्गीय भालजी पेंढारकर यांचे पणतू आकाश पेंढारकर दिग्दर्शित ‘ सर्किट ‘ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत लातूरकर अभिजीत कवठाळकर ….। वैभव तत्त्ववादी , ऋता दुर्गुळे, रमेश परदेशी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. तसेच मराठवाड्याची व लातूरची गायिका मधुवंती बोरगांवकर यांचे सिनेपार्श्व गायिका म्हणून या चित्रपटात पदार्पण होत आहे .एकाच चित्रपटात एकच गावातील दोघांचा सहभाग असणे ही खूपच दुर्मिळ बाब आहे .लातूरकरांसाठी हा एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल… !
‘ सर्किट ‘ या चित्रपटास अभिजीत कवठाळकर यांनी संगीत दिलेले आहे , तर मधुवंती बोरगांवकर यांनी दोन गण्यांचे पार्श्वगायन केलेले आहे .याबद्दल या दोघांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे .तसेच या चित्रपटात सोनू निगम, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांची पण गाणी आहेत .ही गाणी व या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून सिने रसिकांना या चित्रपटाविषयी खूपच उत्सुकता लागून राहिलेली आहे.
pl see video
👇👇👇👇👇
महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री व लातूरचे सुपुत्र स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांना मानवंदना देण्यासाठी ‘ घे भरारी … ‘ हे गाणे तयार करण्यात आले होते .या गाण्याचे संगीत दिग्दर्शन अभिजीत कवठाळकर यांनी केले होते आणि त्यांच्यासह आदर्श शिंदे, आनंद शिंदे या तिघांनी मिळून हे गाणे म्हटलेले होते .लातूर फेस्टिवल मध्ये हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. तेव्हापासून अभिजीत प्रकाशझोतात आला होता .कुटुंब ,डिस्को सन्या , झकास, मॅटर ,सिंगल ,येना पुन्हा यासह 15 ते 16 चित्रपटाला अभिजीत कवठाळकर यांनी संगीत दिलेले आहे. कलर मराठी वरील गाजलेल्या ‘ हे मन बावरे ‘ या सिरीयलची निर्मिती देखील अभिजीत कवठाळकर यांनी केलेली होती. काही चित्रपटाला त्यांनी संवाद लेखक पण केलेले आहे.