निलंगा – आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रस्तावित केलेल्या ‘प्रजिमा – ४७ बोरसुरी – कळमुगळी – माळेगाव – तांबळवाडी या ८.५ किमी लांबीच्या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ७.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या निधीमधून दर्जेदार रस्ते विकासाचे जाळे निर्माण होत आहे.
मागच्या दोन – तीन वर्षांत झालेल्या अतिवृष्टीने मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.त्यामुळे या रस्ता सुधारणा कामांसाठी निधीची आवश्यकता पाहाता आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करीत या सात महिन्यांत जवळपास २५० कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे.त्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रस्ते विकासाची कामे सुरू होताना दिसत आहेत. याच आठवड्यात मंजूर झालेल्या औसा तालुक्यातील रस्त्यांना पकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत औसा मतदारसंघातील २९.५ किमी लांबीच्या रस्ते सुधारणा कामांसाठी २२.७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.औसा तालुक्यातील आणि कासार सिरसी मंडळातील अनेक रस्ते अर्थसंकल्पीय निधीसह विविध योजनांमधून प्रस्तावित केले असून सातत्यपूर्ण पाठपुरावा करून उर्वरित रस्त्यांसाठी सुद्धा निधी मंजूर करून आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले आहे.
………………………………..
आ. अभिमन्यू पवार यांचा सत्कार…
हिप्परसोगा- कात्तपुर – हासेगाव मुख्य रस्ताला निधी मंजुर केल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांचा हिप्परसोगा जनतेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी, अमोल सोमवंशी, हेमंत पाटील, विवेक देशमुख, जगदिश यादव, गोविंद यादव, बळवंत पाटील, अजय पाटील, राम पाटील, अमर पाटील, राम यादव आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.