21 C
Pune
Wednesday, December 25, 2024
Homeठळक बातम्या*सांब स्वामी महाराजांच्या जयघोषात निटूर नगरी झाली भक्तीमय*

*सांब स्वामी महाराजांच्या जयघोषात निटूर नगरी झाली भक्तीमय*

गुरू श्रद्धेचे स्थान,गुरु असे महान, सकल जगी ; उपाचार्यरत्न सांब शिवयोगीश्वर महाराज

निलंगा-(प्रशांत साळुंके)-
सुख दुःख प्रश्न गुरु जवळ मांडा. सर्व प्रश्नांची उत्तरे गुरूकडे असतात. गुरुच्या सानिध्याने तुमच्यातील राग ,लोभ, मोह, माया,द्वेष कमी होत असतो, गुरु स्वत्वाची जाण ,गुरु श्रद्धेच स्थान! गुरु असे महान !सकल जगी !!कारण गुरु हे माऊली असतात.आई नंतर गुरूंनाच आपण माऊली म्हणतो तपोनिधी सांब महाराज पशू आणि मानवावर सारखेच प्रेम करत असत.ते प्रत्यक्षात मृत्युंजय होते.विद्येच्या जोरावर त्यांनी हजारो रूग्णांना प्लेग सारख्या महाभयंकर आजारातून बरे केले..आज इथून जाताना सद्विचार,आचार घेऊन जा.अंतःकरणातून भक्ती करा.
असे आवाहन उपाचार्यरत्न सांब शिवयोगीश्वर महाराज यांनी आशिर्वचनश दरम्यान उपस्थित महीला पुरूष भाविकांना केले.


षटस्थल ब्रह्मी १०८ श्री तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज यांचा १३३ वा जन्मोत्सव शनिवार दि.२५ फेब्रुवारी जन्मोत्सव दिनी आशिर्वचन दरम्यान बोलत होते.हा जन्मोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी भव्य स्वरूपात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज की जय, उपाचार्यरत्न बालतपस्वी द्वितीय सांब शिवयोगीश्वर महाराज की जय, जय गुरूराज माऊली जय सांब माऊली या जयघोषात निटूर नगरी भक्तीमय वातावरणात दणाणून गेली होती.दरम्यान रस्त्यावर सडा रांगोळी काढून सुशोभीकरण करण्यात आले होते.ढोल,ताशा,झांज,टाळ,मृदंग च्या गजरात तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज यांच्या मूर्ती व जीवन चरित्र ग्रंथाची अड्डपालखीतून मिरवणूक काढण्यात आली.नंदी ध्वजाचे मिरवणुकीत मुख्य आकर्षण राहीले.रोषणाई,फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.महीला, पुरूषांनी भक्तीभावाने फुगडी खेळत मिरवणुकीत रंगत आणली.उपाचार्यरत्न सांब शिवयोगीश्वर महाराज यांचा तुला भार करण्यात आला.तसेच थोरले सांब स्वामी महाराज यांचा पाळणा कार्यक्रम झाला.
मिरवणुकीत हजारोच्या संख्येने महीला पुरूष भाविक सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर महाप्रसादाने सांबकथेची सांगता झाली.कांताप्पा बुडगे, प्रभुअप्पा बोळेगावे, अजित मठपती, रवी मठपती, विठ्ठल बुडगे,बालाजी अंबेगावे,सोहम मठपती,परमेश्वर बुडगे,विठ्ठल डांगे,त्र्यंबक तत्तापुरे,कुमार डांगे, केदार मठपती,भागवत सुतार,प्रा. अनिल सोमवंशी,शिवराज सोमवंशी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]