19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*माझं लातूर परिवाराचे तिसरे मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीर*

*माझं लातूर परिवाराचे तिसरे मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीर*

लातूर : माझं लातूर परिवार, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ फेब्रुवारी २०२३ वार-सोमवार रोजी गांधी चौक येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नेत्र विभागात सकाळी ९ वाजता मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

माझं लातूर परिवाराचे हे तिसरे मोफत शिबीर असून शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ समीर जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ लक्ष्मण देशमुख, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ श्रीधर पाठक, नेत्र विभाग प्रमुख डॉ उदय मोहिते, डॉ नंदकुमार डोळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ सचिन जाधव, डॉ आनंद कलमे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या भव्य शिबिरात मोतीबिंदू निदान झालेल्या सर्व रुग्णांची शस्त्रक्रिया सुसज्ज अशा नेत्र विभागात टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे. शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. रुग्णांना कसल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणी अर्ज आणि सोबत आधार कार्डची प्रत असणे आवश्यक आहे.

प्रत्यक्ष नोंदणी करण्यासाठी गांधी चौक – ९९२३००१८२४, ९१५६०७१०७१ शाहू चौक – ९४०४५८४५९३, ८६५७०३२२२०, ९२७०८३१७५० यशवंतराव चव्हाण संकुल – ९८२२२२३४२२, ९९७५३५७८९०, औसा रोड – ७७२२०७५९९९, ९४२२६१२२४५ बार्शी रोड – ९८६०१८३५६७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी. जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत मोतीबिंदू शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]