मतदारसंघातील विकास कामासंदर्भात आढावा बैठक..
औसा – शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी प्राधान्याने काम करणे आवश्यक असून नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी संयुक्तपणे काम करावे.जेणेकरून लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होईल शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतरस्ते, फळबाग लागवड, शेततळे, सिंचन विहीरी जनावरांचे गोटे या माध्यमातून त्यांची आर्थिक सक्षमीकरण होवू शकते यासाठी त्यांना प्रवृत्त करावे तर गाव तिथे स्मशानभूमी हि आपली जबाबदारी असून यासाठी प्रशासनाने दिरंगाई करू नये अशी सूचना देत बंधारे युक्त फळबाग लागवड हि संकल्पना राबववी असे निर्देश आमदार अभिमन्यू पवार यांनी दिले आहेत.
औसा विधानसभा मतदारसंघातील विकास कामासंदर्भात त्यांनी (दि.६) रोजी औसा येथे आढावा बैठक घेतली.त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, औशाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, निलंगा उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, औशाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी, निलंगा तहसीलदार अनुप पटेल, औशाचे गटविकास अधिकारी म्हेत्रे, निलंगा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते आदीसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी कासारसिरसी येथे मंजूर झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय व महावितरण कार्यालयाचे उपविभागीय कार्यालय व निवासस्थान बांधणीसाठी जागा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने याचबरोबर औसा येथील मंजूर झालेल्या क्रीडा संकुल उभारणी संदर्भातही जागेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.शेतरस्ते, फळबाग लागवड, शेततळे, सिंचन विहीरी जनावरांचे गोटे या माध्यमातून त्यांची आर्थिक सक्षमीकरण होवू शकते यासाठी त्यांना प्रवृत्त करावे तर गाव तिथे स्मशानभूमी हि आपली जबाबदारी असून यासाठी प्रशासनाने दिरंगाई करू नये अशी सूचना देत. ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही. तिथे शासकीय जमिन अथवा खाजगी जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तातडीने प्रशासनाने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना आमदार अभिमन्यू पवार यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यानी सर्वच शासकीय विभागाच्या कामांचा आढावा घेत कोणत्याही कामात हलगर्जीपणा न करता वेळीत कामे पूर्ण करण्याची सूचना यावेळी संबंधित विभागाला दिल्या.
सामुदायिक विवाह सोहळ्याची माहिती द्यावी – आ.अभिमन्यू पवार
१० मे रोजी आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी औसा व निलंगा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहिद जवानांच्या कुटुंबीयांची तलाठयांनी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबातील विवाह इच्छुक मुलांना सामुदायिक विवाह सोहळ्याची माहिती देऊन विवाह इच्छुकांची नोंदणी तहसीलदारांकडे द्यावी.जेणेकरून या सामुदायिक विवाह सोहळ्याचा लाभ या कुटुंबाला मिळेल अशी सूचना यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.