श्रीमती वैशालीताई देशमुख, सौ.दीपशिखा देशमुख व आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते
लातूर:– लोप पावत चाललेली वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मीड- टाऊन व रीड लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विद्यानंद संस्कृत क्लासेस यांच्या सहकार्याने “रोटरॅक्ट वाचन कट्टा” हा अभिनव असा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
याचा शुभारंभ विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख, चित्रपट निर्मात्या तथा रीड लातूर उपक्रमाच्या संस्थापक सौ.दीपशिखा देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते होणार असून माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, ज्ञानप्रकाश शैक्षणिक संकुलाचे प्रमुख सतिश नरहरे,आदर्श काॅलनी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष बसवेश्वर उटगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदरील कार्यक्रम दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता आदर्श कॉलनी परिसरातील हनुमान मंदिर पाठीमागील बाजूस असलेल्या ग्रीन बेल्ट मध्ये होणार आहे.
“रोटरॅक्ट वाचन कट्टा” हा वाचन प्रेमींसाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देणार असून निश्चितच या उपक्रमातून अनेकांची वाचनाची आवड वृद्धिंगत होईल असा विश्वास रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाउन व रीड लातूर मधील सर्व पदाधिकाऱ्यांना आहे.
25 जानेवारी रोजी शुभारंभ होत असलेल्या “रोटरॅक्ट वाचन कट्टा” या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिड-टाउनचे अध्यक्ष रोट. अंकिता बिरनाळे, सचिव रोट. शौनक दुरुगकर, प्रकल्प अध्यक्ष रोट.सृष्टी बिदादा,रोट. रमण तिवारी,भक्ती गोजमगुंडे व अन्य सदस्यांनी तसेच रीड लातूरचे समन्वयक राजू सी पाटील यांनी केले आहे.