सलाम डॉक्टर

0
356

*मागील वर्षभरापासून संपूर्ण जग Covid Pandemic मुळे एका ठिकाणी स्थिर झाले आहे. लाखो लोक मृत्यूमुखी पडले. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जगभरातील डॉक्टरांनी आपल्या जिवाची पर्वा न करता योगदान दिले. लातूर जिल्ह्यातील डॉक्टरांनीसुद्धा खुप मोठं योगदान दिलं आहे. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ही आहे कि,यामध्ये आपल्या जंगम समाजातील तीन डॉक्टर्सचे योगदान आज विशेष लक्षणीय ठरले. डॉ. नेहा श्रीकांत हिरेमठ या महिला डॉक्टरने आपले चार महिन्याचे तान्हे बाळ असतानासुद्धा स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जोखीम पत्करून Covid सेंटरमध्ये सेवा दिली.रात्री -अपरात्री रुग्णाच्या बाबतीत येणाऱ्या समस्या सोडवून सेवा हेच कर्तव्य मानले.दुसरे डॉ. अरुण बालकुंदे यांनी Covid रुग्णांना नव्याने होत असलेल्या म्यूकरमायकोसिस या जीवघेण्या आजारावर होत असलेल्या कठीण शस्त्रक्रिया पार पाडल्या.आणखी सुद्धा त्यांचे कार्य चालु आहे. तिसरे डॉ. सचिन बालकुंदे. किल्लारी सारख्या ग्रामीण बहुल भागात घाबरलेल्या Covid रुग्णांना आपल्या वैद्यकीय कौशल्यच्या जोरावर असंख्य रुग्णांना जीवदान दिले आहे. कुठलेच Steroid न वापरता रुग्णांना बरे केले. आज 1 जून “डॉक्टर्स डे “च्या निमित्ताने लातूर शहरात झालेल्या विशेष कार्यक्रमात जंगम समाजातील या तीन रत्नांचा Covid pandemic मध्ये लातूर जिल्ह्यात लक्षणीय वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल आमदार श्री. अभिमन्यू पवार साहेब,लातूरचे जिल्हाधिकारी बि. पि. पृथ्वीराज, तसेच भारतातील लोकप्रिय IAS अधिकारी तथा नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड साहेब, डॉ. विठ्ठल लहाने, प्रा. शिवराज मोटेगावकर, श्री. उदय देशपांडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.जंगम समाजासाठी गौरवशाली कार्य करणाऱ्या या तिन्ही तरुण डॉक्टर्सच्या सेवा कार्याला सलाम*..🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here