~ ऑटोनॉमस लेव्हल २ (एडीएएस) तंत्रज्ञानाने सुसज्ज ~
मुंबई, ९ जानेवारी २०२३: एमजी मोटर इंडियाने आज नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचे अनावरण केले. या कारमध्ये अनेक उत्साहवर्धक नवीन तंत्रज्ञान, सर्वोत्तम वैशिष्ट्ये व आरामदायी ड्रायव्हिंग वैशिष्ट्य समाविष्ट आहे. नेक्स्ट-जनरेशन हेक्टर अधिक सर्वोत्तम सुरक्षितता व ड्रायव्हिंग सोयीसुविधेसह ऑन-रोड अनुभव वाढवण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. नवीन एसयूव्हीमध्ये नवीन आकर्षक एक्स्टीरिअर व लक्ष वेधून घेणारे इंटीरिअर्स, सुधारित सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत आणि आकर्षक डिझाइन एलीमेंट्स अनपेक्षित ड्राइव्ह व युजर अनुभव देतात. ५, ६ व ७-आसनी कन्फिग्युरेशनमध्ये सादर करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इंटेलिजण्टली डिझाइन केलेले सीटिंग पर्याय, आकर्षक इंटीरिअर्स आणि एैसपैस जागा आहे.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, ‘‘आम्ही २०१९ मध्ये लाँच केल्यापासून एमजी हेक्टरला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी आमच्या ग्राहकांचे आभार मानतो. हेक्टरने पहिल्यांदाच इंटरनेट कारचा अनुभव दिला. ही नेक्स्ट-जनरेशन हेक्टर लुक्स, इंटीरिअर्स व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एमजी हेक्टरचा दर्जा वाढवते. ही कार आमच्या एमजी शील्ड प्रोग्रामच्या आश्वासनासह येते, जे आमच्या ग्राहकांना विनासायास व सुलभ मालकीहक्क अनुभव देते आणि ग्राहक आता भारतभरातील आमच्या ३०० केंद्रांमध्ये स्वत:हून नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचा अनुभव घेऊ शकतात.’’
ऑटोनॉमस लेव्हल २ एसयूव्हीमध्ये ११ अडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम्स (एडीएएस) वैशिष्ट्यांसह ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) व ऑटो टर्न इंडिकेटर्स आहेत, ज्यामधून परिपूर्ण मन:शांती, सुरक्षितता व आरामदायीपणाची खात्री मिळते. इंटेलिजण्ट ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) वेईकलला लेनच्या मध्यभागी आणि पुढील बाजूस असलेल्या वेईकलपासून सुरक्षित अंतर ठेवत वाहतूक कोंडीच्या स्थितीत किमान प्रयत्न व अधिक सुरक्षिततेची खात्री देते.
नेक्स्ट जनरेशन एमजी हेक्टरमध्ये नवीन सादर करण्यात आलेले स्मार्ट ऑटो टर्न इंडिकेअर्स देखील त्रासमुक्त व सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव देतात. स्टीअरिंग अँगलवर आधारित संबंधित इंडीकेटर लाइट आपोआपपणे ऑन/ऑफ होते. हे ऑटोमॅटिक सिग्नल पार्किंगमधून रस्त्यावर येताना किंवा यू-टर्न घेताना ड्रायव्हर इंडीकेटर देण्यास विसरला तर उपयुक्त ठरेल.
नवीन एसयूव्हीमध्ये भारतातील सर्वात मोठी ३५.५६ सेमी (१४-इंच) एचडी पोर्ट्रेट इन्फोटेन्मेंट सिस्टमसह ब्रॅण्ड-न्यू युजर इंटरफेस आहे. तंत्रज्ञान नवोन्मेष्कारी फर्स्ट-इन-सेगमेंट डिजिटल ब्ल्यूटूथ की आणि की शेअरिंग क्षमतेमध्ये समाविष्ट आहे. इमर्जन्सीमध्ये किंवा चावी हरवल्यास डिजिटल की वेईकल लॉक, अनलॉक, स्टार्ट व ड्राइव्ह करण्यासाठी वापरता येऊ शकते. रिमोट लॉक / अनलॉक वैशिष्ट्याचा वापर करत कार कुठूनही अनलॉक करता येऊ शकते. की-शेअरिंग फंक्शनसह जवळपास दोन व्यक्तींना अतिरिक्त की शेअर करता येऊ शकते.
तसेच नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये ७५ हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्यांसह १०० वॉईस कमांड्स आहेत, ज्याचे श्रेय क्रांतिकारी आय-स्मार्ट तंत्रज्ञानाला जाते, ज्यामध्ये स्मार्टर व आनंददायी ड्राइव्हसाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कनेक्टीव्हीटी, सर्विसेस व अॅप्लीकेशन्स आहेत.
नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इतर प्रमुख सुरक्षितता वैशिष्ट्ये देखील आहेत, जसे ६ एअरबॅग्स, ३६०-डिग्री, एचडी कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस), हिल असिस्ट कंट्रोल (एचएसी), ऑल फोर-व्हील डिस्क ब्रेक्स, सर्व आसनांसाठी ३-पॉइण्ट सीट बेल्ट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक (ईपीबी)आणि फ्रण्ट पार्किंग सेन्सर्स.
५, ६ व ७-आसनी कन्फिग्युरेशन्समध्ये सादर करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टर प्लसमध्ये इंटेलिजण्टली डिझाइन केलेले सीटिंग पर्याय, आकर्षक इंटीरिअर्स व एैसपैस जागा आहे. इंटीरिअर्स ड्युअल-टोन अर्जाइल ब्राऊन व ब्लॅक थीमसह वूडन फिनिशमध्ये उपलब्ध आहेत. ६-आसनी एसयूव्ही सीट्स कॅप्टन कन्फिग्युरेशनमध्ये येतात, तर ७-आसनी वेईकलमध्ये बेंच सीट्स आहेत.
नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये अद्वितीय कार मालकीहक्क प्रोग्राम ‘एमजी शील्ड’ विक्री-पश्चात्त सेवा पर्यायांचा समावेश आहे. तसेच ग्राहकांना प्रमाणित ५+५+५ पॅकेज देण्यात येईल, म्हणजेच मर्यादित किलोमीटर्ससह पाच वर्षांची वॉरंटी, पाच वर्षांचे रोडसाइड असिस्टण्स आणि पाच लेबर-फ्री पीरियोडिक सर्विसेस.