18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeराजकीय*भाजप नंबर वन*

*भाजप नंबर वन*

ग्रामपंचायत निवडणूक

मुंबई ( विशेष प्रतिनिधी )-

राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आणि गावागावात जल्लोष सुरु झाला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपच ठरलाय. त्याची झलक नागपुरातल्या अधिवेशनातही दिसली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप 1 नंबरचा पक्ष ठरलाय. तर 2 नंबरला राष्ट्रवादी आहे. तीन नंबरला काँग्रेस आहे. चौथ्या क्रमांकावर शिंदे गट, तर पाचव्या क्रमांकावर ठाकरे गट आहे. दुसरीकडे प्रत्येक पक्षानं आपआपल्या विजयाचे वेगवेगळे आकडे सांगून दावे केलेत.

ग्रामपंचायतींमधली वर्चस्वाच्या लढाईकडे नजर टाकली तर जिल्ह्यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री सरपंचपदी निवडून आल्यात. पडळकरवाडी ग्रामपंचायतीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आलीय. तसंच पडळकरांच्या आई हिराबाई पडळकर 300 मतांनी निवडून आल्यात.

राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंना धक्का बसलाय. सख्खे मेहुणे बाळासाहेब ओमासे बीडच्या बेडगमधून पराभूत झालेत.

इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई गावगाडा हाकणार आहेत. संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या निवडणुकीत शशिकला पवार विजयी झाल्यात.

बीडमध्ये पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना धक्का दिलाय. बीडच्या 30 ग्रामपंचायतीवर संदीप क्षीरसागर यांच्या पॅनलनं ताबा मिळवला.
अमरावतीत आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाऊ भैय्या कडू सरपंच झालेत.बेलोरा ग्रामपंचायतीत विक्रमी 1100 पेक्षा अधिक मतांनी भैया कडू विजयी झालेत. काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार दत्ता विधाते यांचा त्यांनी पराभव केला. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातील प्रहारचे 34 सरपंच विजयी झालेत.

भोकरदन तालुक्यातील जवखेडा ग्रामपंचायत पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या ताब्यात आलीय. दानवे यांनी भावजय सुमन दानवे सरपंचपदी विजयी झाल्यात. राष्ट्रवादीच्या सुनिता दानवेंचा पराभव केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी रावसाहेब दानवे यांच्यापुढे आव्हान उभे केले होते.

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंनी आपला दबदबा कायम ठेवलाय. 7 ग्रामपंचायत पैकी 6 ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीचा विजय झालाय.बोदवड तालुक्यात 5 ग्रामपंचायती, तर कुऱ्हा ग्रामपंचायतही राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलीय.

सिंधुदुर्गातल्या नांदगाव ग्रामपंचयातीत नितेश राणेंनी ठाकरे गटाच्या वैभव नाईकांना धक्का दिलाय. सरपंचपदासह भाजपनं 9 जागा जिंकल्या. ठाकरे गटाला फक्त एकच जागा जिंकता आली. याच गावात प्रचारावेळी नितेश राणेंनी दिलेल्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. निकालात नांदगावच्या ग्रामस्थांनी राणेंच्या बाजूनं कौल दिलाय.

येवला तालुक्यातल्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांना धक्का बसलाय. येवल्यातल्या 7 पैकी फक्त एकाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी समर्थक पॅनलचा विजय झाला. इतर ठिकाणी ठाकरे गटाचं वर्चस्व राहिलंय.

भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांना पंढरपूरमध्ये धक्का बसला आहे. त्यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या लगतच्या पुळूजवाडी ग्रामपंचायतीवर परिचारक गटाने सत्ता मिळवली आहे.

गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांची कन्या भाविनी पाटील विजयी झाल्यात. मात्र जामनेरच्या मोहाडी ग्रामपंचायतीत त्यांच्या पॅनलचा पराभव झालाय.

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकींचं फार महत्व आहे. ग्रामपंचायतीकडे निवडणुकीचा पाया म्हणून पाहिलं जातं. त्यामुळं ग्रामीण भागात पाळंमुळं बळकट करण्याचा प्रयत्न आपआपल्या पॅनलच्या आधारे प्रत्येक पक्षाचा असतो. त्यात या निवडणुकांमध्ये भाजपनं बाजी मारल्याचं दिसते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]