औसा तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्चस्व कायम
औसा / औसा तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा
सर्व विजयी उमेदवार व नूतन सरपंच यांचा खरेदी विक्री संघ औसा येथे शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना औसा तालुका प्रमुख सतीश शिंदे, औसा बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, युवासेना जिल्हा प्रमुख दिनेश जावळे , नूतन सरपंच मनोज सोमवंशी, अजित सोमवंशी, सुरेश मुसळे , शिवसेना उप तालुका प्रमुख किशोर भोसले, युवासेना तालुका प्रमुख महेश सगर , संतोष सूर्यवंशी , मारुती मगर, मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
तालुक्यातील हिपरसोगा, खुंटेगाव, बोरगाव, सारणी, कवठा, होळी, येळी, सारोळा, हिपरगा, शिवणी लाख, आनंद वाडी, जावळी, उतका , किणीनवरे, याकतपुर, गांजनखेडा, बोरफळ, आदी ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ताब्यात आल्या आहेत सर्व विजयी उमेदवारांचे मशाल भेट देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.