विधानसभेत विधेयक मांडण्याचा निर्णय
कॉंग्रेसने केला विरोध
जाणून घ्या कसा सुरू आहे ‘आर्थिक जिहाद’
बंगळुरू/नवी दिल्ली, 19 डिसेंबर
‘झटका आणि हलाल’ उत्पादने बर्याच काळापासून चर्चेचा विषय आहेत. दरम्यान, कर्नाटकातील भाजपा सरकारने हलाल मांसावर बंदी घालण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर, हलाल मांसावर बंदी घालणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य ठरणार आहे. दरम्यान, कॉंग्रेसने या विधेयकाला विरोध सुरू केला आहे.
भाजपाचे विधान परिषद सदस्य एन. रविकुमार यांनी हे विधेयक सभागृहात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये इंडियन फूड सेफ्टी अँड सिक्युरिटी असोसिएशन (एफएसए) व्यतिरिक्त अन्य कोणत्याही संस्थेद्वारे अन्न प्रमाणीकरणावर बंदी घालण्याचे म्हटले आहे. रविकुमार यांनी ते खाजगी विधेयक म्हणून मांडण्याचा विचार केला होता. पण आता ते हे विधेयक सरकारी विधेयक म्हणून मांडू शकतात.

कर्नाटकात हलाल मांसाचा वाद
कर्नाटकात या वर्षी मार्चमध्ये हलाल मांसाचा वाद सुरू झाला. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रविकु यांनी हलाल मांस विक्रीला ‘आर्थिक जिहाद’ म्हटले होते. हलाल मांस जिहादसाठी वापरले जाते, त्यामुळे मुस्लिमांनी इतरांशी व्यापार करू नये, असे ते म्हणाले होते. यानंतर इतर काही िंहदू संघटनांनीही हलाल मांसाला विरोध केला. मात्र, मुस्लिम संघटना आणि कॉंग्रेससह इतर राजकीय पक्षांनी हलाल मांसाचे समर्थन केले होते.
हलाल मांस म्हणजे काय?
इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण आणि हदीसमध्ये मुस्लिमांचे खाण्याचे ‘हलाल आणि हराम’ असे दोन प्रकार सांगण्यात आले आहेत. एखादा मांसाहारी पदार्थ हलाल असतो, याचा अर्थ तो प्राणी मुसलमानानेच कापला पाहिजे. कापण्याची ही प्रक्रिया देखील निर्धारित आहे. जर दुसर्या पंथाच्या व्यक्तीने जनावराला कापले तर मुसलमान त्याला गैर-हलाल म्हणजेच हराम म्हणतात.
हलाल, ‘रक्ताची अशुद्धता’ आणि धर्मग्रंथाचे प्रतिबंध
मुस्लिमांना सर्व गोष्टी इस्लामिक कायद्यानुसार (शरिया) कराव्या लागतात, असे तज्ज्ञ, अभ्यासकांचे म्हणणे आहे. यामध्ये खाण्यापिण्याचाही समावेश आहे. तसेच, हराम गोष्टी टाळा असे सांगितले आहे. डुकरांना तर इस्लाममध्ये हराम म्हटले जाते. एवढेच नव्हे तर अल्लाचे नाव न घेता कापलेल्या प्राण्यांनाही हराम म्हटले जाते. शिवाय, कुराणमध्ये अशी अनेक आयते (श्लोक) आहेत ज्यात असे म्हटले आहे की मुस्लिमांनी कोणत्याही परिस्थितीत रक्ताचे सेवन टाळले पाहिजे. म्हणजेच इस्लाममध्ये रक्ताला हराम मानले जाते.
प्राण्याला कापण्यापूर्वी त्याला योग्य प्रकारे अन्न आणि पाणी द्यावे. त्यानंतरच जनावराला कापावे, असे इस्लाममध्ये म्हटले आहे. तसेच हलाल फक्त इस्लामिक रीतिरिवाजांशी परिचित असलेल्या विचारी, प्रौढ मुस्लिम पुरुषानेच केले पाहिजे. अल्लाचे नाव न घेता एखाद्या प्राण्याला कापले तर ते हराम आहे. तसेच गैर-मुस्लिम व्यक्तीने प्राण्याला कापणे देखील हराम आहे.
झटका मांस म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचे तर ‘झटका’ या शब्दाचा अर्थ जलद असा होतो. कापण्याच्या (झटका) या पद्धतीमध्ये प्राण्याला कोणताही त्रास न होता लगेच मारले जाते. एका झटक्यात प्राण्याचे डोके ताबडतोब धडापासून वेगळे केले जाते. हलाल आणि झटका यातील आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे झटका ही धार्मिक प्रक्रिया नाही. कमीत कमी यातना देऊन प्राण्याला मारणे ही झटक्याची मूळ कल्पना आहे. तर हलाल प्रक्रियेत प्राण्याला तडफडत मरणासाठी सोडले जाते.
शिखांमध्ये हलाल निषिद्ध
हलालची जाहिरात ही देखील गैर-मुस्लिमांवर इस्लामिक तत्त्वे लादण्याची प्रक्रिया आहे. गैर-मुस्लिम म्हणजेच िंहदू िंकवा शीख इत्यादींना अल्लाच्या नावावर बळी दिलेले मांस खाण्यास भाग पाडले जाते. शीख त्यांच्या धार्मिक श्रद्धेमुळे हलाल मांस खात नाहीत. शीख बांधव हलाल प्रक्रियेला ‘कुट्टा’ म्हणून संबोधतात, ज्याचा अर्थ संथ, वेदनादायक प्रक्रियेत एखाद्या प्राण्याला मारल्यानंतर मिळणारे मांस. शीख विश्वकोशानुसार, 1699 मध्ये शिखांचे अंतिम गुरू, गुरू गोिंवद िंसग यांनी खालसाच्या आदेशाचा संदर्भ देत शिखांना कुट्टा िंकवा हलाल अन्न खाण्यापासून दूर राहण्याचा आदेश दिला होता.
(ऑपइंडिया वरून साभार)