*दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात “वाणिज्य शाखा – करिअरच्या संधी” विषयावर व्याख्यानमाला*
लातूर दि.
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या शंभराहून अधिक संधी व करिअर हे केवळ शिक्षण नसून जीवनास कलाटणी देणारे दिशादर्शक असून देशाचा आर्थिक कणा मजबुतीकरनात वाणिज्य शाखा अव्वल स्थानावर आहे असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. अजित थेटे यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने वाणिज्य शाखा – करीयरच्या संधी या विषयावर गुरुवारी व्याखानमाला आयोजीत करण्यात आली होती त्यावेळीं ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष संजय बोरा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजाराम पवार, महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ अंजली बुरांडे- कोरे समन्वयक प्रा. सुभाष मोरे, उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ अजित थेटे म्हणाले की महाविद्यालयातील इ.११ वी व १२ वी वर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे यशस्वी विद्यार्थिनीशी संवाद करून तिच्या यशस्वी होण्यामागची गाथा या निमित्ताने व्यक्त केली. संस्थेने अशा स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल डॉ थेटे यांनी संस्थेचे कार्याचे कौतुक केले
*विद्यार्थ्याच्या पाठीशी संस्था उभी राहिल*
*संस्था सचिव रमेश बियाणी यांचे प्रतिपादन*
यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष रमेश बियाणी यांनी समारोप केला तसेच त्यांनी भविष्यात वाणिज्य शाखेचे महत्त्व ओळखून अधिक याकडे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे सांगून संस्था विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेईल अशी ग्वाही रमेश बियाणी यांनी दिली तसेच जे जे चांगल करता येईल त्यासाठी संस्था विद्यार्थ्याना मदत करण्याची भूमिका निभावेल असे सांगून अशा व्याख्यानमालातून विचाराची व शैक्षणीक माहिती ची देवाण घेवाण होते असेही ते यावेळी म्हणाले.
सदरील कार्यक्रमाची सुरुवात ही महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाद्वारा स्वागत गीताने संपन्न झाली. तसेच महाविद्यालयातील नव्याने स्थापित सांस्कृतिक विभाग मंडळाचे उद्घाटन तथा नवनियुक्त सांस्कृतिक मंडळ प्रमुख व सदस्य यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ राजाराम पवार समन्वयक डॉ डॉ अंजली बुरांडे यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.एस.एस. जाधव सर यांनी करून दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्ण कारंजे व प्रा. सुनिता नागरगोजे यांनी केले. तर प्रा. सुभाष मोरे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी आदींची लक्षणीय उपस्थिती होती.