19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeउद्योग*पंचगंगा साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ*

*पंचगंगा साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ*

इचलकरंजी / प्रतिनिधी

कबनूर – गंगानगरयेथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि. या कारखान्याने चालू गळीत हंगामापासून दररोज ७५०० मेट्रीक टनाने गाळप होणार असून यावर्षी १० लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. चालू गळीत हंगामासाठी १७ हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे. कारखान्याने प्रतीवर्षी उच्चांकी दराची परंपरा राखली असून ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांनी आपला नोंदवलेला सर्व ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे ,असे प्रतिपादन चेअरमन पी. एम. पाटील यांनी केले.

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याचा सन २०२२-२०२३ या सालचा ६५ वा गळीत हंगाम शुभारंभ चेअरमन पी. एम. पाटील व संचालकांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रथम संचालक महादेव पाटील व त्यांच्या पत्नी सौ. पुष्पा पाटील यांच्या हस्ते ऊस वजनकाटा  पूजन व ऊसाने भरलेल्या  बैलगाडीचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर ऊसमोळीचे पूजन करुन ती गव्हाणीत टाकण्यात आली.
 स्वागत व्हा.चेअरमन जयपाल कुंभोजे यांनी केले. यावेळी संचालक धनगोंडा पाटील, सुनिल तोरगल, प्रताप नाईक, रावसाहेब भगाटे, प्रमोद पाटील, भुपाल मिसाळ, संतोष महाजन, प्रकाश खोबरे, सौ. शोभा पाटील, सौ. रंजना निंबाळकर, प्रभारी कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे, रेणुका शुगर्स चे जनरल मॕनेंजर प्रकाश सावंत, असि. जनरल मॕनेंजर केन सी. एस. पाटील,  एचआर. मॕनेंजर संजय किल्लेदार, कामगार इंटक अध्यक्ष आझाद शेख, उपाध्यक्ष  बापुसो उपाध्ये यांचेसह इंटकचे सदस्य, कामगार, सभासद उपस्थित होते. संचालक  प्रताप पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]