24.9 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसांस्कृतिक*लातूरच्या विकासाचा रथ आणखी पुढे नेवू -दिलीपराव देशमुख*

*लातूरच्या विकासाचा रथ आणखी पुढे नेवू -दिलीपराव देशमुख*


सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांचा विश्वास; बाभळगावच्या दसरा महोत्सवाने घडवले एकतेचे दर्शन

लातूर : आपले नेते आदरणीय विलासराव देशमुख हे ‘जे जे नवे ते ते लातूरला हवे’, असे सांगत आणि नवनवी विकासकामे खेचून आणत. त्यामुळे लातूरच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. सर्वसामान्यांचा विकास साधण्यासाठी त्यांनी निर्माण केलेला विकासरथ आपल्या सर्वांना एकत्रितपणे त्याच गतीने आणखी पुढे न्यायचा आहे, असा विश्वास सहकारमहर्षी, माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख यांनी बुधवारी व्यक्त केला.


आई राजा उदो उदो’चा जयघोष..., ढोल ताशांचा गजर…, जागोजागी घुमणारा सनई व तुतारींचा मंगलमय निनाद…, मिरवणूक मार्गावर होणारी फुलांची उधळण…, हवेत फडकणारे ध्वज… आणि सर्व धर्मीयांचा उत्स्फूर्त सहभाग अशा आनंददायी व चैतन्याने भारलेल्या वातावरणात मिरवणूक काढून एकतेचे दर्शन घडवणाऱ्या बाभळगाव दसरा महोत्सवाला सुरुवात झाली. बाभळगाव आणि पंचक्रोशीतून आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत महादेव मंदीर, मारूती मंदिर, मलंग शहावली बाबा दर्गा, मिसुबाई माता, दुर्गा माता मंदिर येथे मिरवणूक काढून दर्शन घेण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत श्री. दिलीपराव देशमुख बोलत होते.


यावेळी श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, माजी राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे, लातूर ग्रामीणचे आमदार व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. धिरज विलासराव देशमुख, सौ. दीपशिखा धिरज देशमुख, काँग्रेसचे सरचिटणीस अभय साळूंके, काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अ‍ॅड. समद पटेल, अन्वर देशमुख, बाभळगावच्या सरपंच प्रिया मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, सर्जेराव मोरे, संतोष देशमुख, गणपतराव बाजूळगे, विजय देशमुख, महादेव मुळे, पृथ्वीराज सिरसाट, संभाजी सूळ, रविंद्र काळे, दगडूसाहेब पडिले, बालाप्रसाद बिदादा आदी मान्यवर उपस्थित होते.


श्री. दिलीपराव देशमुख म्हणाले, मांजरा परिवार, लातूरचे विमानतळ, रेल्वे, पोलीस मुख्यालय, मांजरा नदीवरील बराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन, विविध विभागीय कार्यालये अशी अनेक कामे, अनेक शासकीय वास्तू विलासराव देशमुख यांनी दूरदृष्टी ठेवून लातूरला आणले आणि लातूरच्या विकासाची घडी बसवली. त्यामुळे आपल्याला पुढील काळात विकासाची गती कधीही कमी होणार नाही, याची जबाबदारी घ्यायची आहे. ती प्रत्येकाने आपल्या खांद्यावर घेऊन सर्वसामान्यांच्या विकासाचे, सर्वसामान्यांच्या हिताचे स्वप्न आपण पूर्ण करत राहू.
श्री. संजय बनसोडे म्हणाले, विकासरत्न विलासराव देशमुख यांचा विचार हा शेतकरी, सर्वसामान्यांच्या हिताचा होता. त्यांनीच येथे समृद्धी आणली. लोकहित आणि लोकशाही मूल्य जपणाऱ्या अशा कुटुंबांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. दरम्यान, विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळवलेले बाभळगाव येथील राम गोमारे, ओम थडकर, सुधीर देशमुख, डॉ. राहूल माने, विशाल गोमारे, मुक्ताराम पिटले, अनिल तापडे यांचा बाभळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

चौकटदसरा महोत्सव हा सर्वधर्मसमभावाचे प्रतिक


बाभळगावचा दसरा महोत्सव हा एका पक्षाचा किंवा कुठल्या एका विचाराचा नाही. हा महोत्सव सर्वधर्मसमभावाचे प्रतिक आहे. एकोपा जपणारा, एकमेकांत स्नेह वृद्धिंगत करणारा आहे. म्हणून या दसरा महोत्सवाला देदीप्यमान व गौरवशाली परंपरा लाभली आहे, असे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी यावेळी सांगितले. आदरणीय विलासराव देशमुख यांनी सदैव विकासाचे राजकारण केले. हे करीत असताना त्यांनी सोन्यासारख्या कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. या कार्यकर्त्यांच्या बळावर विकासाचे मंदीर त्यांनी ठिकठिकाणी उभे केले. आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शाखाली व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली इथला विकास अधिक गतीमान करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते सदैव तत्पर आहोत. यासाठी आपण आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच ठेवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]