18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeठळक बातम्या*जेष्ठ पत्रकार बाळ मकवाना यांचे निधन*

*जेष्ठ पत्रकार बाळ मकवाना यांचे निधन*

अंत्ययात्रेत विविध मान्यवर सहभागी : पञकारांच्या वतीने वाहिली श्रध्दांजली

  • इचलकरंजी-( प्रतिनिधी)– सडेतोड व निर्भिड लिखाण करणारे इचलकरंजी शहरातील जेष्ठ पत्रकार बाळासाहेब उर्फ बाळ खेमजीभाई मकवाना यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.निधनासमयी ते 74 वर्षांचे होते. दरम्यान ,आज मंगळवारी सकाळी
    त्यांच्या निवासस्थानापासून काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत राजकीय , सामाजिक , शैक्षणिक ,पञकारिता यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.तसेच सायंकाळी पञकार कक्षामध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी विविध पञकारांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली

इचलकरंजी शहरातील जेष्ठ पत्रकार


बाळ मकवाना यांनी सुरुवातीच्या काळात सकाळ, सत्यवादी याबरोबरच पुढारीमध्ये काम केले. पुढारीमध्ये ते जवळपास 22 वर्षे होते. वस्त्रनगरी इचलकरंजीची क्रीडानगरी अशी ओळख निर्माण करुन देण्यात पञकार बाळ मकवाना यांचा मोलाचा वाटा होता. आपल्या सडेतोड लेखणीच्या माध्यमातून ते अनेक प्रश्‍नांना वाचा फोडण्यासह अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत होते. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देतानाच इचलकरंजीत रणजी ट्रॉफीचे सामने भरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ते सदस्य होते. श्रीमंत जहागिरदार सरकार यांच्या श्री लक्ष्मी विष्णू देव ट्रस्टचे कामकाज ते पहात होते. ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात व मदत करण्यात ते नेहमीच अग्रभागी असायचे. सध्या ते महासत्तामध्ये ‘राजवाडा चौकातून’ स्तंभलेखनाचे काम करीत होते.
त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचे पार्थिव गावभागातील घरी आणल्यानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, धोंडीलाल शिरगांवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, अमर इंगवले,राष्ट्रगीतचे संपादक अजय जावळे, महासत्ताचे कार्यकारी संपादक तरुण दत्तवाडे, महान कार्यचे संपादक विजय पवार, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, प्रकाश मोरबाळे, रवि रजपुते, भगतराम छाबडा, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, अहमद मुजावर, दीपक राशिनकर, कौशिक मराठे, राजू आलासे, संजय वठारे, दत्तात्रय जोशी आदींसह सर्व पत्रकार उपस्थित होते.
तसेच सायंकाळी पञकार कक्षामध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी विविध पञकारांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.दरम्यान ,
रक्षाविसर्जन गुरुवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]