आरंभ प्रतिष्ठानच्या बीड जिल्हा
सहसचिवपदी चंद्रकांत पाटील
केज / प्रतिनिधी …आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कोअर कमेटीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बीड जिल्ह्याच्या सहसचिव पदावर केज येथील पञकार श्री चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे .त्यांच्या निवडीबद्धल त्यांच्यावर सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे .
या बाबतचे सविस्तर वृत असे की, आरंभ प्रतिष्ठान ही संस्था देशसेवा,समाजसेवा,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत आहे . चंद्रकांत पाटील यांचे पञकारीता, सामाजिक , सांस्कृतिक तसेच अध्यात्मीक कार्याची दखल घेऊन आरंभ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोषजी टाक, उपाध्यक्ष सौ.सारिकाताई नागरे,सचिव अंगद भांडवळकर, कोषाध्यक्ष डाॕ.प्रदिप पाटील , संघटक तथा रणरागीणी कक्षाच्या अध्यक्षा सौ.वंदनाताई कुमावत,सहसचिव डाॕ.सौ.प्रतिमा पाटील ,सहकोषाध्यक्ष सौ.श्रद्धाताई दुसाने कोतवाळ,सहसंघटक तथा संपर्क प्रमुख सौ.अश्विनी पाटील चौधरी यांच्या कोअर कमेटीची बैठक होऊन चंद्रकांत पाटील यांची बीड जिल्ह्याच्या सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे .
आरंभ प्रतिष्ठानचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक खेडकर यांनी चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले असुन आरंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील अडचणी सोडविण्यासाठी प्रतिष्ठान कार्यरत राहील असे सांगितले .
आरंभ प्रतिष्ठानने दिलेल्या जबाबदारी मुळे समाजातील अडचणी सोडविण्यासाठी खुप मोठी मदत मिळणार असुन आपल्या निवडीबद्धल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत .त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातुन स्वागत केले जात आहे .