26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeताज्या बातम्या*घरफोडीतील आरोपींना जेरबंद*

*घरफोडीतील आरोपींना जेरबंद*

चाकूर ( प्रतिनिधी )-घरफोडीतील आरोपींना 12 तासात अटक. चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असे एकूण 8 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त. चाकूर पोलिसांची दमदार कामगिरी

     याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दि.23/08/2022 रोजी पोलीस ठाणे चाकूर हद्दीतील मौजे नळेगाव येथील घरात अज्ञात प्रवेश करून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 9 लाख 57 हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेले आहे. अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे  गुरनं 302/2022 कलम 454, 380 प्रमाणे दिनांक 23/08/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
          गुन्हा उघडकीस आणण्याच्या  उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर व अहमदपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम यांनी गेला माल व अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना देऊन तपासाची चक्र फिरवली.
           गोपनीय माहितीच्या आधारावरून मोठ्या शिताफीने आरोपी नामे

1) उमर मुनवर मुजावर, वय 20 वर्ष, राहणार नळेगाव.
यास ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुल केले व गुन्हात चोरलेले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असे एकूण 8 लाख रुपयाचा मुद्देमाल काढून दिला आहे. गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे चाकूरचे पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही.घाडगे करीत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.निकेतन कदम, पोलीस स्टेशन चाकूर चे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते व त्यांच्या टीमने घरफोडीच्या गुन्ह्याचा अतिशय जलद गतीने व कौशल्य पूर्वक तपास करून अवघ्या 12 तासात गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी,चाकूर श्री.निकेतन कदम, चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते, पोलीस उपनिरीक्षक,घाडगे कपिल पाटील, फड, पोलीस अमलदार योगेश मरपले, कोळेकर,स्वामी,हनुमंत मस्के यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]