19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसांस्कृतिक*आजादी गौरव पदयात्रा*

*आजादी गौरव पदयात्रा*

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १०७५ फूट लांबीच्या तिरंग्यासह आजादी गौरव पदयात्रा.

लातूर प्रतिनिधी १२ ऑगस्ट २०२२ :

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर शहरात १०७५ फूट लांबीच्या तिरंग्यासह आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात लातूर शहरातील दयानंद महाविद्यालय येथून  करण्यात आली . या आजादी गौरव पदयात्रेमुळे लातूर शहरातील वातावरण स्वातंत्र्य आंदोलन,  देशभक्ती व थोर हुतात्म्यांचे बलीदानाच्या आठवणीने भारावून गेल्याचे पहायला मिळाले.

शुक्रवारी चौथ्या दिवशी काढण्यात आलेल्या आजादी गौरव पदयात्रेची सुरुवात लातूर शहरातील दयानंद महाविद्यालय या ठिकाणाहून करण्यात आली. सदरील पदयात्रा खाडगाव रोड मार्गे मार्गक्रमण करीत या पदयात्रेचा समारोप संविधान चौक या ठिकाणी करण्यात आला .यावेळी १०७५ फूट लांबीचा तिरंगा लातूर वासीयांचे लक्ष वेधून घेत होता.

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ब्रिटीश सत्तेच्या विरूध्द मोठा लढा उभा केला होता . या चळवळीत अनेक नेत्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. भारत देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जनतेच्या हिताची धोरणे राबवून सक्षम, बलशाली राष्ट्र उभा केले. काँग्रेस पक्षाने सर्वधर्म समभावाची ध्येयधोरणे आखली, देशाला विकसीत केले. या लढयाचे स्मरण लोकांना व्हावे या करीता आजादी अमृत महोत्सव गौरव यात्रा लातूर शहरातील विविध प्रभागात काढण्यात येत आहे.

या पदयात्रेत अँड.किरण जाधव,सौ.स्मिताताई खानापुरे,सौ सपनाताई किसवे,विजयकुमार साबदे,कैलाश कांबळे, सूर्यकांत कातळे,इम्रान सय्यद,अँड.देविदास बोरूळे पाटील,प्रा.प्रवीण कांबळे,जालिंदर बर्डे,दत्ता सोमवंशी,बाळासाहेब देशमुख,आयुब मणियार,गोटू यादव,पिंटू साळुंके,सचिन गंगावणे,धनंजय शेळके,संजय ओव्हाळ,कुणाल शृंगारे,युनूस मोमीन,तबरेज तांबोळी,हमीद बागवान,आसिफ बागवान, विकास वाघमारे,सिकंदर पटेल,पंडित कावळे,भालचंद्र सोनकांबळे,अविनाश बट्टेवार,सुलेखाताई कारेपूरकर,स्वातीताई जाधव,दिपीकाताई बनसोडे,सायरा पठाण,मंदाकिनी शिखरे,मीनाताई टेकाळे,सुरेखा गायकवाड,अभिषेक पतंगे,अकबर माडजे,बालाजी झिपरे,आसिफ तांबोळी,सिद्धांत कांबळे,महेश शिंदे, राजू गवळी,संदीपान सूर्यवंशी, राजाभाऊ गायकवाड,विकास कांबळे,किरण बनसोडे, गोविंद केंद्रे,आकाश मगर,कुणाल वागज,पवन सोलंकर,विष्णुदास धायगुडे,श्रीकांत गर्जे, अजय वागदरे,बिभीषण सांगवीकर,अराफत पटेल,इसरार पठाण,दिनेश गोजमगुंडे,शेख अब्दुल्ला,अमोल गायकवाड,धनराज गायकवाड,नागनाथ डोंगरे,राजेश गुंठे,बाप्पा मार्डीकर,युसूफ शेख,अशोक भंडारे, आदी मान्यवर उपस्थित होते.

————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]