१२,१३,१४, ऑगस्ट रोजी उत्तरादिमठात होणार धार्मिक कार्यक्रम
लातूर दि. ११.
लातूर येथील श्री उत्तरादिमठ व श्री मध्व मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३५१ वा श्री राघवेंद्र स्वामी आराधना उत्सव लातूर येथील श्री उत्तरा दिमठात १२,१३,१४ ऑगस्ट रोजी होणार असून त्याची जय्यत तयारी सुरु केली असून १२ ऑगस्ट रोजी सकाळी पूर्व आराधना अस्टोत्तर सेवा, सुक्त हवन, भक्ती संगीत सेवा श्री शशी देशमुख सौ वृषाली कोरडे देशमुख यांची सादर होईल दुपारी ११.३o ते १.३० पर्यंत वेद शास्त्र संपन्न पंडित अनंता चार्य काशीकर यांचे वेदातील गुप्त व दिव्य संदेश श्री राघवेंद्र स्वामी जींचा प्रथम अवतार या विषयवार व्याख्यान होईल तर तीर्थ महाप्रसाद दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत राहील असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या आराधना सोहळ्या स भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री उत्तरादिमठ व श्री मध्व मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे
१३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते ११ वाजेपर्यंत पंडीत शिवदास देगलूरकर व ओमकार देगलूरकर यांची भक्ती संगीत सेवा होईल दुपारी तीन ते ३.३० पर्यंत डॉ मोनिका पाटील यांचे महिलांचे आरोग्य या विषयवार महिलांसाठी संवादाचा कार्यक्रम होईल. ४ वाजता प्रसन्न विठ्ठल भजनी मंडळ यांचे कार्यक्रम होतील १४ ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते ८.३० पर्यंत श्री पर्जन्य याग , १o ते ११.३० पर्यंत संगीत सेवा पंडीत जयप्रकाश हरिदास यांचा संच व श्री हरीश कुलकर्णी यांची सेवा होईल ११.३o वाजता व्याख्यान होईल दुपारी १.३o वाजता कार्यक्रमा चा समारोप होईल समारोप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त कोषागार अधिकारी देविदास कुलकर्णी व विवेकानंद रुग्णालयाचे सचिव डॉ राधेश्याम कुलकर्णी यांची उपस्थिती राहील या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री उत्तरदिम ठाचे प्रमुख रघुत्तामाचार्य जोशी श्री मध्व मंडळ चे अध्यक्ष ऍड श्रीराम देशपांडे, सचिव संजय राजहंस ,उपाध्यक्ष किशोर कुलकर्णी, कोशाध्यक्ष मनोज देशपांडे सहसचिव प्रवीण देशपांडे,सहकोषध्यक्ष भानुदास भातंब्रेकर, प्रसिध्दी प्रमुख हरीराम कुलकर्णी, सदस्य वसंतराव बेंडे,बाळासाहेब देशपांडे, ईश्वर कुलकर्णी, धनंजय बोरगांवकर, प्रवीण सौदत्ती, सौ संयुक्ता राजहंस, सौ अमिता देशपांडे, सौ पूजा जोशी, सौ मनीषा भतंब्रेकर, सौ नभा जोशी, तथा सर्व सदस्य यांनी केले आहे..