स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर शहरात आजादी गौरव पदयात्रा
पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर प्रतिनिधी ११ ऑगस्ट २०२२ :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर शहरात आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात लातूर शहरातील अंबा हनुमान मंदिर या ठिकाणाहून करण्यात आली .या आजादी गौरव पदयात्रेमुळे लातूर शहरातील वातावरण स्वातंत्र्य आंदोलन, देशभक्ती व थोर हुतात्म्यांचे बलीदानाच्या आठवणीने भारावून गेल्याचे पहायला मिळाले.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ब्रिटीश सत्तेच्या विरूध्द मोठा लढा उभा केला होता . या चळवळीत अनेक नेत्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. भारत देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जनतेच्या हिताची धोरणे राबवून सक्षम, बलशाली राष्ट्र उभा केले. काँग्रेस पक्षाने सर्वधर्म समभावाची ध्येयधोरणे आखली, देशाला विकसीत केले. या लढयाचे स्मरण लोकांना व्हावे या करीता आजादी अमृत महोत्सव गौरव यात्रा लातूर शहरातील विविध प्रभागात काढण्यात येत आहे.
तिसऱ्या दिवशी काढण्यात आलेल्या आजादी गौरव पदयात्रेची सुरुवात गुरुवारी लातूर शहरातील अंबा हनुमान मंदिर या ठिकाणाहून करण्यात आली. या पदयात्रेचा समारोप जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी करण्यात आला .
या पदयात्रेत अँड. किरण जाधव, अँड. समद पटेल, अँड.दीपक सूळ, सी.स्मिताताई खानापुरे, सौ.स्वातीताई जाधव, सौ.सपनाताई किसवे, गणपतराव बाजुळगे, इम्रान सय्यद, सुर्यकांत कातळे, अँड. देविदास बोरुळे पाटील, अँड. फारुख शेख, प्रा.प्रवीण कांबळे, जालिंदर बर्डे, सुपर्ण जगताप, अहेमद खान पठान, सुनील पडीले, रत्नदीप अजनिकर, विकास वाघमारे, हरीओम भगत, आकाश भगत, दत्ता सोमवंशी, गोटू यादव, आसिफ बागवान, बासले हारून, डॉ.बालाजी सोळुंके, सौ.रुपाली सोळुंके, युनुस मोमीन, तबरेज तांबोळी, इसरार सगरे, विजय टाकेकर, श्रीमती.वर्षाताई मस्के, सुंदर पाटील कव्हेकर, सिकंदर पटेल, पंडित कावळे,कलीम शेख, अय्युब मणियार, अराफात पटेल, सौ.स्वातीताई जाधव, सौ.शीतल मोरे, सौ. तनुजाताई कांबळे, बप्पा मार्डीकर, अमित जाधव, अभिजित इगे, अकबर माडजे, विजयकुमार धुमाळ, विठ्ठल गलांडे, बिभीषण सांगवीकर, आसिफ तांबोळी, शैलेश भोसले, महेश शिंदे, राजू गवळी, संदीपान सूर्यवंशी, विकास कांबळे, कुणाल वागज, मैनोदिन शेख,पावन सोलंकर, पवनकुमार गायकवाड, फारूक शेख, युसुफ शेख, अजय वागदरे, श्रीकांत गर्जे, नागनाथ डोंगरे, संजय सुरवसे, गौतम मुळे, अशोक भंडारे, प्रमोद जोशी, जाफर शेख, अमोल गायकवाड, धनराज गायकवाड, राजेश गुंटे, श्री.शेरेकर, पिराजी साठे यांच्यासह लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी होते.