लिंगायत महासंघातर्फे राजीव गांधी यांचे लिंगायत धर्मात स्वागत
लातूर ः अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांवर श्रध्दा ठेवून परवा कर्नाटकातील एका कार्यक्रमात लिंगायत धर्माची दिक्षा घेतली. त्याबद्दल राहुल गांधींचे अभिनंदन! व लिंगायत महासंघाच्यावतीने त्यांचे लिंगायत धर्मात हार्दिक स्वागत करण्यात आल्याचे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी सांगितले.
12 व्या शतकात समानतेचे धोरण स्विकारणारे महात्मा बसवेश्वर खुप मोठे क्रांतीकारक होते. त्यांनी बाराव्या शतकात पहिला आंतरजातीय विवाह लावला. त्यांनी जगात पहिल्यांदा लोकशाही अंमलात आणली. अनुभवमंटपरूपी संसदेची त्यांनी स्थापना केली. अशा महात्मा बसवेश्वरांच्या विचारांवर व लिंगायत धर्माच्या तत्वावर श्रध्दा ठेवून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी लिंगायत धर्माची दिक्षा घेतली. त्यांचे लिंगायत महासंघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने हार्दिक अभिनंदन! व लिंगायत धर्मात त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले आहे.
राहुल गांधी हे सहिष्णु नेतृत्व असून सर्व धर्माचा आदर करणारे व अन्यायाविरूध्द झटणारे पुरोगामी विचाराचे व्यक्तिमत्व आहे. सध्या त्यांचा पक्ष सत्तेत नसला तरी आजही प्रबळ विरोधी पक्षाचे नेते म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहिले जाते. कर्नाटकाच्या हवेरी मटाच्या महास्वामीजींनी ते उद्याचे पंतप्रधान असतील अशी भविष्यवाणी केली आहे. या धर्मगुरूंच्या भविष्यवाणीचे लिंगायत महासंघाने स्वागत केले आहे. राहुल गांधी यांनी जगद्गुरू मुरूग्गा राजेंद्र विद्यापीठाचा दौरा केला आणि डॉ.शिवमुर्ती मुरूग्गा शरणारू यांच्याकडून त्यांनी इष्टलिंग दिक्षा घेतली. राहुल गांधींनी घेतलेल्या दिक्षेमुळे कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील लिंगायत समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या दिक्षेमुळे लिंगायत समाज हा राहुल गांधींच्या पाठीमागे उभा टाकेल असा विश्वास लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी व्यक्त केला.