नैसर्गिक आपत्ती काळात सरकार शेतकऱ्यांशी पाठीशी – आ. अभिमन्यू पवार.
एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी – आ. अभिमन्यू पवार
निलंगा – संततधार पाऊस व शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावने नुकसान झालेल्या औसा विधानसभा मतदारसंघातील निलंगा तालुक्यातील हरीजवळगा व उस्तूरी शिवारातील शेतात जाऊन आ. अभिमन्यू पवार यांनी पाहाणी केली नैसर्गिक आपत्तीकाळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून साधारणपणे आठवडाभरात पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत देण्याची कार्यवाही केली जाईल असा विश्वास व्यक्त करीत यासंदर्भात निलंगा येथे झालेल्या आढावा बैठकीत एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
जुलै महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे व शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावने शेतकऱ्यांच्या खरिप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून झालेल्या या नुकसानची प्रत्यक्ष शेतात जाऊन आ. अभिमन्यू पवार यांनी दि. ३० जुलै रोजी निलंगा तालुक्यातील हरीजवळगा व उस्तूरी याठिकाणी पाहाणी केली.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले की या नैसर्गिक आपत्तीच्या काळात राज्यातील सरकार आपल्या पाठीशी आहे. जवळपास पन्नास टक्के पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे आठवडाभरात पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत देण्याची कार्यवाही केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या नंतर निलंगा येथे बैठक घेऊन अतिवृष्टी, संततधार पाऊस व गोगलगाय प्रादुर्भावामुळे कासार सिरसी मंडळातील झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. पंचनाम्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या आढावा बैठकीला तहसीलदार आवळे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, निलंगा तालुका कृषी अधिकारी काळे, नायब तहसीलदार आडसुळे, महापुरे आदीसह तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक उपस्थित होते.
या पाहाणी दौऱ्यात उस्तुरी येथील शेतकऱ्यांनी हरणांच्या कळपा उच्छाद व रानडुकराचा उन्मादामुळे शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असून प्रामुख्याने या वन्यप्राण्यांकडून ऊसाचे मोठे नुकसान केले जात असल्याचे सांगितले. यावेळी कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, बळीराम पाटील, नारायण इंगळे, ओम बिराजदार, परमेश्वर बिराजदार,नितिन पाटील, मल्लिकार्जुन दानाई, धनु होळकुंदे, जिलानी बागवान, कल्पना ढविले, परमेश्वर बिराजदार, विजय चव्हाण, वामन मुळे, भास्कर पाटील, धोंडीराम बिराजदार, पंडित फुलसुरे, राहूल ईश्वरे यासह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.