लातूर; दि. २७ (प्रतिनिधी )-— ‘दीपस्तंभ ‘ लातूरातील एक आगळा-वेगळा ग्रुप… रक्तदान चळवळ असो की अन्य कुठलाही सामाजिक प्रश्न .. यासाठी धावून जाणारा ग्रुप म्हणजे ‘दीपस्तंभ ‘…. !या ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष सोहळा एका आगळावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रशासन व विविध सामाजिक संघटना आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहेत . समाजाच्या विविध प्रश्नांसाठी धावून जाणाऱ्या आणि सामाजिक एकतेसाठी सदैव अग्रेसर असणारा ‘दीपस्तंभ’ ग्रुप यासाठी दूर कसा राहू शकतो … ? या ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा हा उत्सव सगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला आहे आणि ग्रुपचे अध्यक्ष योगेश कर्वा यांच्या मार्गदर्शनाखाली 120 जणांचे परिवार असणारे सदस्य यासाठी एकवटले आहेत .यासाठी त्यांनी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे .
पेडल फाँर नेशन-2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दीपस्तंभ ग्रुपच्या वतीने पेडल फॉर् नेशन 2022 हा आगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी राजीव गांधी चौकातील बिडवे लाँन येथून जवळपास 1000 सायकलिस्ट 75 किलोमीटर अंतर पार करून स्वातंत्र्याला अभिवादन करणार आहेत . 75 किलोमीटर , 50 किलोमीटर , 25 किलोमीटर आणि 10 किलोमीटर असे स्पर्धकांसाठी अंतर ठेवण्यात आले आहे विशेष म्हणजे औरंगाबाद येथील प्रसिद्ध सायकलपटू निकेत दलाल हेही या अभियानात सहभागी होणार आहेत. ते स्वतः अंध आहेत. अशी माहिती, ' दीपस्तंभ 'चे अध्यक्ष योगेश कर्वा यांनी यावेळी बोलताना दिली.
ओमप्रकाश झुरळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .नायब तहसीलदार श्रावण उगिले , सोनू डगवाले डॉ. विमल डोळे , श्रीरंग मद्रेवार आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले . युवराज पाटील यांनी यावेळी 'दीपस्तंभ ' ने हाती घेतलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.