19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeकृषी*माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर शेती बांधावर*

*माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर शेती बांधावर*


नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करत शेतकर्‍यांना दिलासा


निलंगा/प्रतिनिधी ः- अतिवृष्टी, सातत्याने पडणारा पाऊस परिणामी, गोगलगाय व इतर रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीनची पिके उद्वस्त होऊ लागली आहेत. अनेक शेतकर्‍यांना दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी अडचणी आलेला असून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर थेट शेती बांधावर पोहचले. यावेळी शेतकर्‍यांची संवाद साधत त्यांना दिलासा देत सरकार आपल्या पाठिशी खंबीरपणे असल्याची ग्वाही देत लवकरच पिकांची नुकसानभरपाई मिळेल असा शब्द माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिला.


गेल्या महिनाभरापासून पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावेली आहे. जिल्ह्याच्या कांही भागात अतिवृष्टी झालेली असून सातत्याने पडणारा पाऊस यामुळे खरीपाचा पेरा धोक्यात आलेला आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे गोगलगाय सह इतर किड रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळत आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी करण्याकरीता माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर हलगरा, तगरखेडा व औराद शहाजानी परिसरात शेतीबांधावर पोहचले. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गवसाणे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे आदींसह अधिकारी, पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.


अतिवृष्टी व गोगालगायच्या प्रादुर्भावामुळे खरीपांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात असून गोगलगायीने सोयाबीनची पिके उद्वस्त केलेली पाहण्यास मिळत आहे. अतिवृष्टी व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पिके उद्वस्त झालेली असून शेतकर्‍यांना दुबार व तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. या कठीण प्रसंगात शेतकर्‍यांना सरकारकडून मदत मिळणे अपेक्षीत आहे. शेतीबांधावर पोहचलेल्या माजी मंत्री आ. निलंगेकरांनी पिकांची पाहणी करत शेतकर्‍यांना दिलासा दिला. सरकारने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून लवकरच पंचनामे पुर्ण होतील असे सांगितले. त्याचबरोबर पंचनाम्याचा अहवाल शासन दरबारी पोहचल्यानंतर शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी आ. निलंगेकरांनी शेतकर्‍यांना दिली. या कठीण प्रसंगात शेतकर्‍यांनी धीर धरावा, सरकार तुमच्या पाठीशी खंबरपणे उभे आहे, असे सांगून लवकरात लवकर शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी आपण बांधील आहोत असा शब्दतही माजी मंत्री आ. निलंगेकरांनी यावेळी दिला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, निलंग्याचे शहराध्यक्ष विरभद्र स्वामी, चेरअमन दगडू साळूंके, औरादचे शहराध्यक्ष राजा पाटील, आदींसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]