पुरग्रस्तांच्या मदतीला अहमदपूरकर आले धावून..!
सम्राट मित्र मंडळाच्या अवाहनाला प्रतिसाद..!!!
अहमदपूर दि. -कोकणातील पूरग्रस्तांना सढळ हाताने मदतीसाठी शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरीक सरसावल्याचे भावनिक चित्र आज येथे पहावयास भेटले.
येथील सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत केलेल्या ‘एक हात मदतीचा’ या पुरग्रस्तांच्या मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौक येथून या मदत फेरीस सूरूवात करण्यात आली.प्रामुख्याने अन्नधान्याचे कीट,नवीन कपडे,तसेच आर्थिक मदत असे साधारणतः मदतीचे अवाहन करण्यात आले होते.त्या नूसार शहरातील सर्वसामान्य नागरीक,व्यापारी,कार्यकर्ते, यांनी माणूसकीची भावना जोपासत जमेल त्या पध्दतीने मदत केली.ही मदत फेरी शहरातील वेगवेगळे चौक,शहरातील मुख्यमार्गाने काढण्यात आली.सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख मन्नानभाई यांनी माईंकच्या माध्यमातून मदतीचे अवाहन केले.
तर या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाभाडे,शरद सोनकांबळे,बजरंग गायकवाड,पत्रकार अजय भालेराव, मतीन शेख,शरद कांबळे,बालाजी ढवळे सर,राहूल सूर्यवंशी,गणेश मूंडे,सूनिल कोमले,सचिन बानाटे,विशाल गायकवाड, रवी गायकवाड आदींनी या कामी पुढाकार घेतला.