23.1 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeकृषी*लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे सरसगट पंचनामे करण्यात यावेत- आ. कराड*

*लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे सरसगट पंचनामे करण्यात यावेत- आ. कराड*

भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ.रमेशआप्पा कराड यांची मागणी

       लातूर दि.१८– जिल्ह्यात गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे आणि सततच्या पावसामुळे नुकसानीत आलेल्या रब्बी हंगामातील पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

         लातूर जिल्हयात यावर्षी समाधानकारक पाऊस होत असून खरीपाच्या पीकांची उगवण चांगली होत आहे. मात्र गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होवून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की गोगलगाय ही एक बहुभक्षी किड आहे पिकांचे रात्रीच्‍या वेळी सक्रीय राहून मोठया प्रमाणात नुकसान करते, या गोगलगायीमुळे सोयाबीनसह खरीपाच्यां इतरही पीकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

           गोगलगायीचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हाभरात अनेक ठिकाणी गोगलगायीने सोयाबीनसह इतर पीकेही नष्टा केली आहेत. त्या‍चबरोबर सततच्या पावसामूळे पीके पिवळी पडत आहेत, पीकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे सोयाबीनसह खरीपाच्या पीकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]