*32 तासाच्या अन्‍नत्याग आमरण उपोषणानंतर लातूर शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न मार्गी*

0
142

आयुक्‍तांचे उपोषणकर्त्यांना पत्र ः जनहिताचा निर्णय झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्‍लोष
लातूर दि.25-08-2023 _शहरातील वाढता कचरा, वेळवर न येणारी घंटागाडी, मोकाट प्राण्यांची वाढ या  अस्वच्छतेमुळे व डेंग्यू मलेरियामुळे नागरिकांवर मृत्यू ओढावण्याची वेळ आलेली आहे. तरीही मनपा प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. शहरामध्ये जागोजागी कचर्‍याचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून येत आहे. परिणामी मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व निष्क्रीय कारभारामुळे डेंग्यू मलेरियाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यातच लातूरातील नागरिक प्राध्यापक शैलेंद्र परिहार सरांचा डेंग्यू मलेरियाच्या आजाराने मृत्यू झालेला आहे. याबरोबरच  शहरातील अनेक रूग्ण डेंग्यूच्या आजाराने त्रस्त असून त्यांना शहरातील विविध रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. ही बाब गंभीर असूनही मनपा प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. ही बाब लक्षात घेऊन भाजपा युवा मोर्चाच्यावतीने शहरातील गांधी चौकात गेल्या 32 तासापूर्वी अन्‍नत्याग आमरण उपोषण सुरू केले. त्यातच स्वच्छतेअभावी नागरिकांच्या जीवितास बाधा ठरत असलेल्या आयुक्‍तांवर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पोलीस प्रशासनाला देताच मनपा आयुक्‍त बाबासाहेब मनोहरे, आयुक्‍त मंजूषा गुरमे, स्वच्छता विभाग प्रमुख आर.जी.पिडगे आदींनी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांना लेखी आश्‍वासन देऊन मागण्या मान्य केल्या असून उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषण थांबविण्यात आले.
यावेळी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदासराव काळे, उपोषणकर्ते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, रवी सुडे, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अ‍ॅड गणेश गोजमगुंडे, विठ्ठल घार, संतोष तिवारी, महात्मा बसवेश्‍वर मंडळाचे संजय गिर, ज्योतीराम चिवडे, रविशंकर लवटे, आकाश बजाज,  काका चौगुले,अ‍ॅड. पुनम पांचाळ, प्रियंका जोगदंड, आफ्रिन खान,  शिवाजी कामले, पांडूरंग बोडके, प्रेम मोहिते, सचिन जाधव, प्रगती डोळसे, जयश्रीताई भुतेकर, कोमल सावंत, हेमा येळे,  वैभव डोंगरे, सागर घोडके, अ‍ॅड.पंकज देशपांडे, प्रेम मोहिते, राजेश पवार, काका चौगुले, गोरोबा गाडेकर, नगरसेविका रागिणीताई यादव, गजेंद्र बोकण, आकाश जाधव, अमर पाटील, ऋषिकेश क्षिरसागर, लक्ष्मण मोरे,अ‍ॅड. सचिन कांबळे, ज्योती मार्कंडेय, रत्नमाला घोडके, गजेंद्र बोकण,ऋषी जाधव, संतोष जाधव, चैतन्य फिस्के, राहुल भूतडा, उकीरडे अप्पा, गाडेकर महाराज,संतोष ठाकूर, पंकज शिंदे,महादेव पिटले,सचिन सुरवसे, आदित्य फफागिरे, व्यंकटेश हांगरगे, दूर्गेश चव्हाण, शाहरूक शेख, ऋषीकेश इगे, अ‍ॅड.हरीकेश पांचाळ, हणमंत काळे, गौरव बिडवे, धिरज भैरूमे, ऋषिकेश बेळंबे,सचिन यादव, आश्‍विन कांबळे, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भाजपा युवा मोर्चाच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आलेल्या मागण्यापैकी सध्या चालू असलेले कंत्राटदार यांना कामात सुधारणा करण्याबाबत लेखी आदेशीत करण्यात आले असून तरीही कामात सुधारणा नाही केल्यास नियुक्‍त घनकचरा व्यवस्थापन समितीमार्फत त्याची तपासणी करून आलेल्या अहवालाप्रमाणे कंत्राट रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, टोईंगच्या संदर्भात मा.पोलीस अधिक्षक, मनपा आयुक्‍त, उपायुक्‍त यांच्या समवेत 23 ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आली असून पार्कींग कंत्राटदार यांच्या कामात सुधारणा करण्याबाबत समक्ष बैठकीत आदेशीत करण्यात आले, जनाधार सेवाभावी संस्थेच्या कामात सुधारणा करण्याबाबत लेखी आदेश देण्यात आले असून तरीही कामात सुधारणा नाही झाल्यास नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, सध्यःस्थितीत कंत्राटदारासोबत संयुक्‍त बैठक घेऊन तत्काळ शहर स्वच्छ करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, लातूर शहरातील कचर्‍याचे ढीग उचलण्याची कार्यवाही सुरू केली असून डास निर्मूलन व धुर फवारणी चालू करण्यात आलेली आहे. अशा सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व्यक्‍त केले जात आहे.

समस्त लातूरकरांचे आभार – अजितसिंह पाटील कव्हेकर
लातूर शहरातील कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेच्या प्रश्‍नाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना शिंदे गट, बाळासाहेबांची शिवसेना युवा सेना, परवानाधाक रिक्षा संघटना, शिवगर्जना सेवाभावी संस्था, चाकूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कपील माकणे, आई तुळजाभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सव समिती, डालडा फॅक्ट्री परिसरातील आम जनता, सार्वजनिक शिव जन्मोत्सव सोहळा समिती गांधी चौक, सकल जंगम समाज जुना गुळ मार्केट लातूर, अपंग हक्‍क स्वाभीमानी प्रतिष्ठान महाराष्ट्र लातूर, असोसियशन ऑफ क्‍लीनिकल लॅबोरॅटी संघटना लातूर, लिंगायत विकास परिषद लातूर, विश्‍व हिंदू महासंघ (भारत), विश्‍व हिंदू रक्षा संघटन, सह्याद्री  प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी, व्यापारी आघाडी, लातूर शहर पूर्व भाग, नागरी हक्‍क कृती समिती लातूर यासह 50 विविध पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे मनपा प्रशासन जागे झाले आणि त्यांनी जनहिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला कचर्‍याचा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावण्याचे लेखी आश्‍वासन भाजपा युवा मोर्चाला दिले असल्यामुळे भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यासह समस्त लातूरकरांचे आभार व्यक्‍त करून त्यांचे प्रेम कायम पाठिशी रहावे अशी अपेक्षाही भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केले.
——————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here