निलंगा मतदारसंघातील नागतीर्थवाडी ठरले मराठवाड्यातील शंभर टक्के लसीकरणाचे पहिले गाव…
” अक्का फाऊंडेशनचा ” पुढाकार : दिव्यांग,वृृृध्दांना लसीकरण आपल्या दारी याउपक्रमामुळे गाव अव्वल ठरले…
निलंगा,—( प्रशांत साळुंके )— निलंगा मतदारसंघातील देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी गावाने कोविड-19 लसीकरणात आघाडी घेतली असून,गावात शंभर टक्के लसीकरण झाले आहे.मराठवाड्यातील शंभर टक्के लसीकरण करणारे पहिले गाव नागतीर्थवाडी ठरले आहे.याचा परिसरातील गावांनीही बोध घ्यावा लागेल.
अक्का फाऊंडेशनच्या पुढाकारातून नागतीर्थवाडीमध्ये लसीकरण मोहिम राबविण्यात आली.यागावाची लोकसंख्या 674 असून,18 वर्षांपुढील सर्वांचेच लसीकरण पूर्ण झाले आहे.तरूणांसह वयोवृृध्दांनी तसेच दिव्यांगांचे लसीकरण झाले.लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला होता.त्याला गावकर्यांनी प्रतिसाद दिला असून,गाव शंभर टक्के लसीकरणाबरोबरच कोरोनामुक्तीकडे गेले आहे.
निलंगा विधानसभा मतदारसंघाचे माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार अक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के लसीकरणाला यश मिळाले आहे.तहसीलदार सुरेश घोळवे,देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी गावात वेळोवेळी भेट देऊन नागरिकांना लस घेण्याबाबत मार्गदर्शन केले.तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.गंगाधर परगे,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.गुरमे,वैद्यकीय अधिकारी चैतन्य हत्ते यांनी मागणीनुसार लस उपलब्ध करून दिली.त्यामुळे शंभर टक्के लसीकरण झाले.
गावकर्यांसह आरोग्य कर्मचार्यांचे परिश्रम…
आरोग्य अधिकारी डाॅ.अमोल नरहरे,आरोग्य सेविका शोभा सुरवसे,इर.व्ही.बिराजदार,जे.के.मळभागे तसेच,आशा कार्यकर्त्यांसह गावातील राज गुणाले,उपसरपंच विष्णुदास गुणाले,ग्रामसेवक श्रीकांत पताळे व ग्रामपंचायत सदस्यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले.दिव्यांग व वयोवृध्दांना घरी जाऊन लस दिली.