9 ऑगस्ट क्रांती दिनी किसान कामगार समितीचा एल्गार
लातूर ..नवी दिल्ली येथे शेतकरी कामगार ऊन, पाऊस, वारा ,थंडी याची पर्वा न करता केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या माथी लादलेले काळे कायदे रद्द करण्यात यावेत यासाठी आंदोलन करत आहेत परंतु केंद्रातील भांडवल धार्जिणे सरकार आदाणी अंबानी यांच्या समोर गुढघे टेकवत आहे. देशातील शेतकरी कामगार जो पर्यंत काळे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही.9आगस्ट क्रांती दिनी लातूर येथे आंदोलनाचा एल्गार पुकारला असुन डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील हुतात्मा स्मारका समोर निदर्शने करण्यात आली.यावेळी भाई उदय गवारे, कॉ संजय मोरे, ॲड गोविंद शिरसाट, राजकुमार होळीकर, कॉ विश्वभर भोसले, कॉ सुधाकर शिंदे, सुरेश कातले, ॲड योगेश शिंदे, अँड सदानंद हुडगे,शाम आराटे,शुभम आराटे,सचीन बोयणे, अँड यशवंत चव्हाण, अँड हरीदास निटूरे, अमोल गायकवाड,पवन देशपांडे, वासुदेव जाधव, वैभव आराटे यांच्या सह अनेक जण सहभागी झाले होतेेे.
.