32.1 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeराजकीय*५१ गावच्या १०६१ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर*

*५१ गावच्या १०६१ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर*

आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून 

५१ गावच्या १०६१ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर

          लातूर दि.१७ – भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत /घरकुल योजनेअंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ५१ गावच्या १०६१ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय मार्फत १५ जानेवारी २०२४ रोजीच्या पत्रानुसार मंजूर झाले आहेत.

             विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकासाठी इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करून त्यांना घरकुलाचे प्रस्ताव मंजूर केले जातात निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लक्ष २० हजार रुपये याप्रमाणे निधी दिला जातो. सदरील योजनेअंतर्गत १५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार लातूर जिल्ह्यातील ३४१७ लाभार्थ्यांना वैयक्तिक घरकुलाचा लाभ मंजूर झाला आहे. लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध गावच्या पात्र आणि गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री मा. अतुलजी सावे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. केलेल्या पाठपुराव्यामुळे रेणापूर तालुक्यातील १९ गावातील ७६१ लाभार्थ्यांना लातूर तालुक्यातील २३ गावातील २७० लाभार्थ्यांना आणि भादा सर्कल मधील ९ गावातील ३० लाभार्थ्यांना असे एकूण लातूर ग्रामीण मतदार संघातील ५१ गावातील १०६१ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. 

           रेणापूर तालुका – इटी ४, कोळगाव ८१, गरसुळी ४१, घनसरगाव १५, जवळगा ६०, डिगोळ देशमुख ५०, पोहरेगाव १०५, फरतपूर २३७, मोहगाव १, शेरा ३, समसापूर ९२, खानापूर २, तत्तापूर ७, कुंभारी २, वंजारवाडी १०, कुंभारवाडी १८, दवणगाव ३, रामवाडी पा २८, मुरढव २, लातूर तालुका –  कानडी बोरगाव १२, अंकोली २, कासारखेडा १, कासार जवळा २९, कृष्णनगर तांडा ३५, चिकुर्डा ४३,  बोडका / वाकडी १, बोरी ७, मळवटी ३, वांजरखेडा २, सलगरा बु ५२, चिंचोलीराव २४, नागझरी २, सोनवती ४, भोसा २३, बामणी ३, सारसा १,  शिराळा ३, चिंचोली ब . ८, धनेगाव १,  सारोळा २, दगडवाडी ११, भादा सर्कल – उटी बु ५, कवठा केज ४, जायफळ ३, बोरगाव न १, लखनगाव ५, वडजी २, शिंदाळवाडी ७,  शिवली बु. २, आंदोरा १ याप्रमाणे ५१ गावात १०६१ लाभार्थींना घरकुल मंजूर झाले आहे.

         वैयक्तिक घरकुल मंजूर झाल्याबद्दल आ. रमेशअप्पा कराड यांचे त्या-त्या गावातील लाभार्थ्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]