प्रकृती कडून संस्कृती कडे.
भारत विकास संगम
२९ तारखेपासून कर्नाटकातील प्रकृती नगर शेडम येथे भारतीय संस्कृती उत्सवाचे आयोजन
लातूर ;(प्रतिनिधी )-भारत विकास संगम या सामाजिक संघटनेच्या वतीने कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील प्रकृती नगर येथे दिनांक 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सातवा भारतीय संस्कृती उत्सव आयोजित करण्यात आला आहे या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे अशी माहिती,भारत विकास संगम चे राष्ट्रीय सह संयोजक अशोक टांकसाळे , महादेव गोमारे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. प्रकृती केंद्रित विकासात समर्पित जगातील हा सर्वात मोठा उत्सव आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कर्नाटकातील प्रकृती नगर येथे आयोजित या भारतीय संस्कृती उत्सवाची सविस्तर माहिती अशोक टांकसाळे व महादेव गोमारे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना दिली .ते पुढे बोलताना म्हणाले की,भारत विकास संगम हा एक विचार मंच असून, समाजातील सक्रिय सकारात्मक कार्य करणाऱ्या सज्जन व्यक्ती – नव देवता व संस्था – नव तीर्थ यांच्या एकीकरणातून प्रकृती केंद्रित विकासाचे कार्य 2004 सालापासून देशभरात करत आहे.आता त्याचे चांगले परिणाम मिळत आहेत.
‘गाव – आईची कुस आहे’ ती सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरण पूरक शेती,विकेंद्रित गृह,लघु उद्योग हीच आत्मनिर्भर ग्राम व निरोगी समाज विकासाची गुरुकिल्ली आहे.या विषयी ठोस कृती व अर्थपूर्ण मार्गदर्शन करण्याच्या हेतूने भारतीय संस्कृती उत्सव – ७ चे प्रकृती नगर सेडम जिल्हा कलबुर्गी येथे दिनांक 29 जानेवारी 2025 ते 6 फरवरी 2025 या काळात आयोजन करण्यात आले आहे .

240 एकर क्षेत्रावर संपन्न होणाऱ्या वरील नऊ दिवसीय भव्य कार्यक्रमात साधारण पणे 30 लाख लोक,त्यात देशभरातून दहा हजार संस्था व संपुर्ण देशातून अनेक तज्ञ मान्यवर सहभागी होऊन याचा सकारात्मक संदेश जगातील 80 कोटी जनते पर्यंत पोहंचणार आहे.
याउत्सवातकृषी,ग्रामविकास,आहार,आरोग्य,उद्योग,सेवा,धर्म, संस्कृती व पर्यावरण या सर्व विषयातील तज्ञांचे अमूल्य मार्गदर्शन होणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
भारतीय विकास संगमचे राष्ट्रीय सहसंयोजक श्री अशोक टांकसाळे हे महाराष्ट्र शासनाच्या सिंचन विभागातून 2008 सली उप अभियंता म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर ते राष्ट्रीय चिंतक आदरणीय श्री के एन गोविंदाचार्य याने 2004 सालि स्थापन केलेल्या प्रकृती केंद्रित विकासासाठी कार्य करणाऱ्या भारत विकास संगम या विचार मंचशी 2009 साला पासून जोडले गेले आहेत.या साठी पूर्ण भारतभर प्रवास करतात.
या कार्यक्रमास सौ सुधा मूर्ती,इस्रो चे माजी प्रमूख श्री सोमनाथ जी,केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, गो भक्त गोपाल भाई सुतारीया, केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी, शेती तज्ञ श्री बी बी ठोंबरे, जल तज्ञ श्रीराजेंद्र सिंह, पद्मश्री लक्ष्मण सिंह लापोडिया,ग्लोबल विकास ट्रस्ट चे श्री मयंक गांधी, वैद्य हितेश जानी, पंचगव्य चिकित्सक डॉ. डी पी रमेश, शिक्षण तज्ञ डॉ आशोक ठाकूर, श्री माधव रेड्डी थोर राष्ट्रीय चिंतक व भारत विकास संगम चे संस्थापक के एन गोविंदाचार्य, संरक्षक श्री बसवराज जी पाटील व अनेक तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

सहा एकर क्षेत्रावर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे पूर्ण नऊ दिवस तज्ञ वैज्ञानिक ब्रह्मोस, मंगळयान, चंद्रयान ,रोबोट्स इत्यादी विषयात मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ऋषी कणाद ते कलाम या विज्ञान प्रवासाचे एक्जीबिशन प्रस्तुत करण्यात येत आहे.
भारतीय संस्कृती उत्सव म्हणजे प्रकृति केंद्रित ज्ञान भांडाराचे विशाल सादरीकरण आहे. दीर्घ काळ आणि विपुल धन खर्च करून प्राप्त होणारे ज्ञान या संस्कृती महोत्सवात सहभागी होऊन अत्यंत अल्प काळात प्राप्त करून घेण्याची सुवर्णसंधी शोध प्रबंध अभ्यासक, विदयार्थी, शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते,उद्योजक यांना आहे.
तरी लातूर जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी,शिक्षक,शेतकरी,व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी, जास्तीत जास्त संख्येने उत्सवास उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा अशी भारत विकास संगम करण्यात येत आहे.
…………
अशोक टांकसाळे
राष्ट्रीय सह संयोजक
भारत विकास संगम
लातूर 9423398833