औसा :- येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून या प्रक्रियेत अर्ज भरताना राहिलेल्या त्रुटी, अपूर्ण कागदपत्रे यांची पूर्तता २३ जुलै २०२२ पर्यंत करून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राचार्या कु. रनभीडकर आय. टी. यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
ऑनलाईन प्रवेश सत्र २०२२ अंतर्गत आयटीआयला प्रवेश निश्चित करण्यासाठी औसा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरताना बऱ्याच बाबी अपूर्ण ठेवल्याचे निदर्शनास आले असून यामध्ये प्रवेश प्रक्रियेत नोंदणी (Registraition) केलेले परंतु अद्याप प्रवेश अर्ज पूर्ण भरलेला नाही असे विद्यार्थी, प्रवेश अर्ज पूर्ण भरलेला आहे परंतु अद्याप प्रवेश अर्ज आणि प्रवेशशुल्क जमा केलेले नाही असे विद्यार्थी, प्रवेश अर्ज शुल्क जमा केलेले आहे परंतु अद्याप प्रवेश निश्चित (confirm) केलेले नाही असे, प्रवेश अर्ज निश्चित केलेला आहे परंतु अद्याप प्रथम फेरीसाठी विकल्प (option) व प्राधान्य सादर केलेले नाहीत असे विद्यार्थी.
अशा सर्व विद्यार्थ्यांनी वरील अपूर्ण बाबींच्या पूर्तता प्रत्यक्ष औद्योगिक संस्थेत येऊन दिनांक २३ जुलै २०२२ पर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करून आपला प्रवेश निश्चित करावा अन्यथा प्रवेश अर्ज अपूर्ण असल्याकारणाने आपल्याला आयटीआय मध्ये प्रवेश मिळणार नाही अशी माहिती प्राचार्या रनभीडकर यांनी आज दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.