तब्बल 18 महिन्यानंतर दयानंद कला ऑफलाईन पध्दतीने सुरु
लातूर. दि.20 शासन व विद्यापीठ परिपत्रकान्वये राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नीत महाविद्यालयातील वर्ग दिनांक 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करणेबाबत परिपत्रक निर्गमीत करण्यात आले. त्यानुसार आजपासून महाविद्यालय ऑफलाईन सुरु करण्यात आले आहेत. तब्बल 18 महिन्यानंतर महाविद्यालयात विद्यार्थी येत असून महाविद्यालयीन विद्यार्थी हे बहुतांश 18 वर्षांवरील असून बहुतेक विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. तसेच राज्यातील कोव्हिड-19 बाधित रग्णांची संख्या मोठया प्रमाणात कमी झालेली असून सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणाखाली आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नीत महाविद्यालयांमध्ये कोव्हिड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करून विद्यार्थ्यांकरिता ऑफलाईन पध्दतीने नियमीत वर्ग सुरु करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. तसेच कोव्हिड-19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, कामांच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निर्देश, राज्य शासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्त्वे किंवा मानक कार्य प्रणाली (एसओपी) तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू करुन तत्त्पुर्वी विद्यार्थी हित लक्षात घेता सर्व वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करण्यात आल्या आहेत. कोव्हीड-19 चे सर्व नियमांचे पालन करुन विद्यार्थ्यांची संपूर्ण व्यवस्था महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
यामध्ये सर्व प्रथम विद्यार्थ्यांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. बऱ्याच दिवसांनी महाविद्यालय सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण आहे. तसेच महाविद्यालय परिसरात एक प्रकारचे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव मा. रमेशजी बियाणी यांनी महाविद्यालये सुरु झाल्याबाबतचा व कोव्हिड19 च्या नियमाचे पालन होते की नाही याचा आढावा घेतला आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, डॉ. मल्लीकार्जून करजगी श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय, डॉ. आर.एस. पारवे, डॉ. एस.व्ही. साळुंके, डॉ. ए.बी. जोशी, डॉ. एस.पी. सांगोले, डॉ. पी.एम.मान्नीकर, डॉ. पी.एस. सुर्यवंशी, डॉ. बी.टी. घूटे, डॉ. एस.जी. पाटील, डॉ. एम.एच. खंडागळे, डॉ. आर.एम. खंदारे, डॉ. एस.बी. राऊतराव, प्रा. शैलेश सुर्यवंशी व प्रशासकीय कर्मचारी आदी उपस्थित होते.
—————————— —————————— ————–

——————————