17.2 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसांस्कृतिक*ह भ प गुरु बाबा महाराज यांना जीवन गौरव पुरस्कार*

*ह भ प गुरु बाबा महाराज यांना जीवन गौरव पुरस्कार*

एमआयटी.विश्वशांती विद्यापीठ पुणे यांचा’समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ नाथसंस्थानचे पाचवे पिठाधिपती श्री. गुरुबाबा महाराज यांना जाहीर !

औसा.दि.३०: (माध्यम वृत्तसेवा)-विज्ञान अध्यात्म आणि तत्वज्ञान जागतिक परिषदेचे औचित्य साधून संबंध वारकरी संप्रदायाचा ध्यास आणि श्वास असणाऱ्या अध्वर्य , घराण्यातील सत्पुरुष म्हणून एम.आय.टी. विश्वशांती विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने सद्गुरु श्री. वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसाचे पाचवे पिठाधिपती सद्गुरु श्री. गुरुबाबा महाराज औसेकर यांना यावर्षीचा ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून ३ ऑक्टोंबर रोजी जागतिक परिषद सोहळ्यात पुणे येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यासंबंधीची घोषणा व तसे निमंत्रण श्री. गुरुबाबा महाराज औसेकर यांना मिळाले असून संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर माऊली जन्मउत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष व श्री. संत जगत्गुरु श्री. तुकाराम महाराज यांचे ३७५ व्या वैकुंठ गमन सोहळा वर्ष पर्वात विज्ञान अध्यात्म आणि तत्वज्ञानाची सांगड असलेल्या जागतिक परिषदेच्या औचित्याने माईर्स ( एम. आय. टी.) विश्वशांती केंद्र पुणे यांना वारकरी संप्रदायातील जुन्या परंपरेतील थोर, जाणकार, मानव कल्याणाचे कार्य करणाऱ्या, पावन घराण्यातील थोर निष्ठावंत अश्या धर्मप्रसारक सत्पुरुषांचा ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येत आहे.
ज्या विभूतीनी, घराण्याची, परंपरेची सेवा केली. संप्रदायाची वैष्णव परंपरा अगदी लहान वयापासून समर्थपणे सांभाळून अद्वैत भक्तीचे तत्व-भजन चक्रीभजन, किर्तने, प्रवचनाच्या माध्यमातून, महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा संबंध भारत व पाश्चात्य देशात जावून रुजवली व लोकउध्दारक कार्य केले अश्या नाथसंस्थानच्या सद्गुरु श्री. गुरुबाबा महाराज यांना ३ ऑक्टोंबर – घटस्थापनेदिनी खास सोहळ्यात विश्वराजबाग लोणी-काळभोर येथे सायंकाळी ६.०० वा. प्रदान करण्यात येत आहे. हा पुरस्कार जाहीर होताच नाथ संस्थानच्या हजारो शिष्य भक्तांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]