24.9 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसामाजिकहोय , मी काश्मीर फाईल्स नित्यनेमाने पाहतोय...

होय , मी काश्मीर फाईल्स नित्यनेमाने पाहतोय…

खरं सांगायचं, तर काश्मीर फाईल्स मी मागची ३२ वर्षे पाहताेय…
हाेय, ३२ वर्षांपासून नित्यनेमाने पाहताेय…
●●● दत्ता जाेशी, औरंगाबाद

साधारण १९८९-९० दरम्यान काश्मीर खाेऱ्यातून इस्लामी दहशतवाद्यांच्या उद्रेकाच्या बातम्या येऊ लागल्या, तेव्हा ताे पहिल्यांदा दिसला. पुढे या उद्रेकाचे रुपांतर अत्याचारात, रक्तपातात, बलात्कार आणि विस्थापनात झाले तेव्हाही याचे अस्वस्थ दर्शन झाले.

तरुण भारतात तेव्हा सुधीर जाेगळेकर यांचे झेलमची हाक यायचे. उदगिरात जंबाे झेराॅक्स वगैरे सुविधा नव्हत्या. काॅलेजात भित्तीपत्रक करायचाे त्या माेठ्या कागदावर टपाेऱ्या अक्षरांत हे सारे लेख उतरवून शहरातील मुख्य चाैकात मी नेऊन लावायचाे. हा विषय समाजापर्यंत पाेहाेचवण्याची माझ्या परीने धडपड करायचाे. तेव्हाही डाेळ्यांसमाेर हाच चित्रपट दिसायचा…



पुढे काही काळाने विद्यार्थी परिषदेने चलाे काश्मीरची हाक दिली आणि सप्टेंबर १९९० मध्ये देशभरातून आम्ही १० हजार कार्यकर्ते जम्मूत धडकलाे. तिथल्या विस्थापितांच्या छावण्यांतील राहुट्यांतून गलितगात्र हाेऊन राहणारे काश्मिरी हिंदू भेटले, त्या राहुट्यांतून फिरलाे, त्यांच्या डाेळ्यांतील वेदना वाचल्या तेव्हाही हाच चित्रपट दिसत हाेता.

रुबिया सईदच्या दिखावटी अपहरणातून पाच अतिरेकी साेडणाऱ्या देशद्राेही गृहमंत्री मुफ्तीमुहम्मद सईदच्या आग्रहातून आणि व्हिपी सिंगांच्या निर्णयातूनही हाच चित्रपट दिसला आणि आमच्या आंदाेलनाला जम्मूतून पुढे जाऊ देऊन उधमपुरात अडवण्यात आले, तेव्हा शासनकर्त्यांच्या मुजाेरीत ताे झळकलेला हाेता.

विनाेद तावडे आणि अन्य काही कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या विद्यार्थी परिषदेच्या सत्यशाेधन समितीने काश्मीर खाेऱ्यात भेट देऊन आणलेले छापील पुरावे आणि मशिदींवरील, भिंतींवरील रंगविलेल्या देशद्राेही घाेषणा, मशिदींवरील लाऊडस्पीकरवरून दिलेल्या धमक्यांच्या रेकाॅर्डिंगच्या कॅसेटस यातूनही या चित्रपटाची धग जाणवली… माता भगिनींच्या अब्रूंचे धिंडवडे आणि बंधूंच्या रक्ताच्या चिळकांड्या छायाचित्रांतून दिसायच्या तेव्हाही हाच चित्रपट नजरेसमाेर असायचा.



मुरलीमनाेहर जाेशी यांच्या एकता यात्रेतून, त्या यात्रेला अडविणाऱ्या सरकारी यंत्रणेतून आणि प्रयत्नपूर्वक मिळविलेल्या परवानगीनंतर श्रीनगरच्या लाल चाैकात मुरलीमनाेहरजी आणि नरेंद्र माेदी आदींनी डाैलाने व बेडरपणे फडकावलेल्या तिरंग्यातही मला हाच चित्रपट दिसला हाेता.

काही वर्षांपू्र्वी दाेन वेळा पर्यटनाच्या निमित्ताने खाेऱ्यात जाण्याचा याेग आला तेव्हाही शाेधक नजर माझ्या हिंदू बांधवांच्या विस्थापनाच्या खाणाखुणा शाेधायची. जळालेली घरे, उद्ध्वस्थ झालेली मंदिरे, बाटवलेली पूजास्थळे, इंडियन्स गाे बॅकची वाॅलपेंटिंग्ज… या सगळ्यांतूनही हाच चित्रपट दिसत गेला…

आज विवेक अग्निहाेत्रींसारख्या दिग्दर्शकाने वास्तव चित्रपट काढायचे धाडस केले. ताे याकडे धंदा म्हणून पाहताेय का, हा चित्रपट आणखी कशा प्रकारे काढायला हवा हाेता वगैरे गावगप्पांकडे पाहण्यासाठी मला वेळ नाही. मी जाे चित्रपट ३२ वर्षे माझ्या मनःचक्षूंसमाेर पाहताेय, ताे वास्तव स्वरुपात पडद्यावर झळकताेय, आपल्याच देशबांधवांच्या वाट्याला आलेले दुःख समाजाच्या मनात जागवताेय, हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.

इस्लामी दहशतवाद क्रूर असताे, माता भगिनींची विटंबना करणारा असताे. कर्तबगारांना खच्ची करणे, मंदिरांना जमीनदाेस्त करणे हाच इस्लामी दहशतवादाचा खरा चेहरा आहे. आमच्या पुराेगामी, काॅंग्रेसी, उदारमतवादी, कम्युनिस्ट, साेशालिस्ट नरपुंगवांनी वेगवेगळ्या बुरख्यांखाली त्याला झाकलेले हाेते. या निमित्ताने ताे गाेंडस बुरखा टराटरा फाडला गेला आणि साऱ्या देशाला या कथित धर्मनिरपेक्षतेचे उघडेनागडे दर्शन घडले. माझ्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मी ३२ वर्षांपासून हा चित्रपट पाहताेय. आता थिएटरात जाऊन पाहायचा आहे. प्रवास आणि अन्य काही कारणांमुळे अजून जाता आले नाही, पण लवकरच जाईन. साेशल मीडियावरून आतापर्यंत अनेक ठिकाणहून या पायरेटेड फिल्मच्या लिंक्स आलेल्या आहेत. त्यातील एकही लिंक मी अजून उघडलेली नाही. उघडणार नाही. हा चित्रपट मला थिएटरमध्येच जाऊन पाहायचा आहे.

हे पाहून झाल्यानंतर मी काही लिहिणार नाही. अनेकांनी खूप उत्तम रीतीने लिहिलेले आहे. त्यावर मी आणखी वेगळे काय लिहिणार?

पण एक आवाहन मात्र नक्की करीन. पायरेटेड फिल्म पाहू नका. तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊनच पाहा. बाहेर हाऊसफुल्ल बाेर्ड लावून आत माेजकीच लाेक दिसत असतील तर त्याची छायाचित्रे, थिएटरचे नाव – गाव साेशल मीडियावरून जाहीर करा. करमणूक कर अधिकाऱ्यांना हाऊसफुल्लच्या बाेर्डांचे फाेटाे पाठवून १०० टक्के करवसुलीसाठी विनंती करा.

आपण सारे एवढे तरी करू शकताे.

आणि एक गाेष्ट नक्की लक्षात राहू द्या. काश्मिरातील हिंदूंबाबत जे घडले ते पाहण्यासाठी हा चित्रपट पाहू नका.

तुमच्या आमच्या कुटुंबांबाबत भविष्यात काय घडू शकते, याचे भान येण्यासाठी हा चित्रपट पाहा. सर्वाेच्च न्यायालयापासून संपूर्ण न्यायव्यवस्थेचे आदेश धाब्यावर बसवून मशिदींवरून दिली जाणारी बांग एक दिवस धर्मबांधवांना चिथावणी देण्याची पीए सिस्टिम म्हणून काश्मीर खाेऱ्यात वापरली गेली हाेती. ते देशभरात हाेऊ शकते का? इतिहास पाहता शक्यता नाकारता येत नाही.

स्वतः पाहा. सहकुटुंब पाहा. विचार करा. सकारात्मक कृती करा. ज्या प्रमाणे देशभरात बाॅम्बस्फाेट घडविणारे सगळेच अतिरेकी इस्लामी का असतात याचे उत्तर मिळत नाही, तसेच अशा देशद्राेही कृत्यांचा कडाडून विराेध देशभरातील आपले इस्लामी बांधव का करत नाहीत, धर्माच्या नावावर हाेणाऱ्या या हिंसाचाराचा ठाम विराेध का करत नाहीत, याचेही उत्तर मिळत नाही.

या उत्तराच्या शाेधातच आपले, आपल्या कुटुंबाचे, परिवाराचे, देशाचे हित सामावलेले आहे. याचे प्रामाणिक उत्तर शाेधले गेले तर आपण, आपल्या पुढच्या पिढ्या हिंदू म्हणून जगू व मरू शकतील. नाही तर देशभरात काश्मीर खाेऱ्याची पुनरावृत्ती हाेऊ शकेल.

दत्ता जाेशी, औरंगाबाद

( लेखक जेष्ठ पत्रकार ,लेखक आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]