19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराष्ट्रीयहोय,मेधा पाटकर यांची ED चौकशी झालीच पाहिजे

होय,मेधा पाटकर यांची ED चौकशी झालीच पाहिजे

….

मेधा पाटकर यांच्या अगणित संपत्तीची चौकशी व्हायलाच पाहिजे
खादीच्या किती साड्या भांडारात आणि
स्लीपर किती संग्रहात
याची संख्या जाहीर झालीच पाहिजे.(जशा मोजल्या होत्या जयललिता आणि मार्कोसच्या पत्नीच्या !!!)

खांद्यावर अतिशय जड पिशव्या ती वाहते,
त्या पिशव्यांत नेमके असते तरी काय ? हे देशाला ED ने सांगितलेच पाहीजे…
जीवनशाळा नावाच्या अनेक शाळा ती चालवते म्हणे,
त्या शाळांमध्ये ती डोनेशन तर घेत नसेल ना
त्याचाही हिशोब आता मांडलाच पाहीजे
मुंबईत झोपडपट्टीवासीयांचे लढे लढताना,
त्या झोपड्यांखालचे
प्लॉट तर तिचे नाहीत ना ?

हे ही ED ने तपासायलाच हवे….


खरेच ईडी साहेब,
तपासाच मेधाची संपत्ती —

पाड्या- पाड्यावर पसरलेले तिचे ‘सोन्या’सारखे (gold)कार्यकर्ते
नर्मदेच्या बुडालेल्या गावांमध्ये खोल मातीच्या खाणीत तग धरून राहिलेले ‘हिरे’ (diamond)
जल जंगल जमिनीसाठी लढणाऱ्या माणसांच्या भावविश्वातील शेकडो हेक्टरचे प्लॉट ….(land)
आणि
दडपशाही ने तुटू न शकलेले एकमेकातील’बॉण्ड्स'(bonds) आणि
जन्मभरासाठी आंदोलनात केलेल्या ‘गुंतवणुकी ‘(investments)
संपत्तीसाठीचे सगळे इंग्रजी शब्द अगदी अचूक जुळतात बघा…
म्हणून या बॉण्ड आणि गुंतवणुकीही तपासायला हव्यात…

इथे आम्हाला एक पक्ष चालवायला कित्येक कोटी लागतात,
सलग ३० वर्षे ३ राज्यात इतके काम चालवायला अब्ज रुपये तर लागले असतील ना…?

पैशाशिवाय काम उभे राहू शकते हे मिस कॉल वर उभे राहिलेल्या आमच्या पक्षाकडूनच आता miss झाले आहे…
त्यामुळं भरवसाच बसत नाही या साध्या दिसणाऱ्या बाईवर…
तिच्या या अमूर्त संपत्तीची मोजदाद झालीच पाहीजे….

हात लावील तिथे सोन्यासारखी माणसे उभे करणाऱ्या
या ‘ लेडी मिडास ‘ ची
सोनेरी संपत्ती आता खणून काढाच….
आम्ही सोबत आहोत तुमच्या ….

हेरंब कुलकर्णी
8208589195

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]