32.1 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeराजकीय*हिशोब मागणाऱ्यांनी १० वर्षात काय केले हे सांगावे -आमदार देशमुख*

*हिशोब मागणाऱ्यांनी १० वर्षात काय केले हे सांगावे -आमदार देशमुख*

७० वर्षात काँग्रेस पक्षाने काय केले असे
विचारणाऱ्यांनी १० वर्षात काय केले हे जनता जाणते
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

 माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे
यांच्या प्रचारार्थ देवणी येथे जाहीर सभा

 डॉ. शिवाजी काळगे यांना सर्वाधिक
मताधिक्य देण्याचा देवणीकरांचा निर्धार

लातुर (प्रतिनिधी ) : दि. २५ एप्रिल २०२४काँग्रेस पक्षाने मागील ७० वर्षांत काय केले असे विचारणाऱ्या विरोधकांनी१० वर्षात काय केले हे जनता चांगल्या प्रकारे जाणून आहे, असे म्हणत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय,ते लातुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ देवणी येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

लातुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीकाँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि. २५ एप्रिल रोजी दुपारी जिल्ह्यातील देवणी येथील मेन रोड बस स्टँड नजीक जाहीर सभा पार पडली.राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यासह डॉ शिवाजी काळगे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे जागृती शुगर्स अँड अलाईड येथील हेलिपॅडवर देवणी काँग्रेस कमिटी कडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर मल्लिकार्जुन मानकरी यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट देत लातुर लोकसभा निवडणूक अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

डॉ. शिवाजी काळगे यांना मत देऊन दिल्लीला पाठवावे आपल्या आयुष्यात यापुढील काळात बदल घडेल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की,लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा दुसरा टप्पा सुरू असून आज आपण डॉ.शिवाजी काळगे याना निवडुन आणण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो आहोत. निलंगा विधानसभा मतदार संघातील असलेले आपले लोकसभेचे उमेदवार असून ते लातुर लोकसभा मतदार संघाचे संसदेत नेतृत्व करणार आहेत. लातुर लोकसभेचे भाजपचे उमेदवार मागील काळात आपल्याकडे फिरकले सुद्धा नाहीत, त्यांनी जनतेच्या समस्या कधी सोडवण्यासाठी पुढे आले नाहीत. कोविड काळात घराबाहेर पडले नाहीत असा लोकप्रतिनिधी आपल्याला हवा का याचा विचार आपण करावा. देशात आज काय परिस्थिती आहे, हे आपण पाहत आहात यावर काँग्रेस पक्षाने आपले ग्यारंटी कार्ड प्रकाशित केले असून या ग्यारंटी कार्डची अंमलबजावणी होण्यासाठी आपण डॉ. शिवाजी काळगे यांना आपले मत देऊन दिल्लीला पाठवावे लागेल तरच आपल्या आयुष्यात यापुढील काळात बदल घडेल अन्यथा देशातील परिस्थिती परिणामी आपले दैनंदिन जीवन देखील अवघड होऊन बसेल.मागील १० वर्षात आपण काय केले, भाजपने काय केले हे आधी सांगायचे सोडून निलंग्यातील तथाकथित नेत्याला उठसुठ बाभळगाव, लातुरचे नाव  घेऊन टीकाटिप्पणी करण्या पलीकडे काही सुचत नाही, असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर हल्ला चढविला.

शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे काम केले पण विरोधक म्हणतात ७० वर्षात काँग्रेस पक्षाने काय केले. लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नदीवर बॅरेज बांधले गेले, ज्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता ते पाणी परीसरातील शेतीला आज फायदा होतो आहे.प्रत्येक गावात साठवण तलाव झाले, ऊसाचे उत्पादन वाढले, आपल्या जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी व त्यावर अवलंबून असलेला घटक सुखावला.जागृती शुगर्सच्या माध्यमातून सर्वाधिक ऊस गाळप करून देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे काम केले आहे, आणि विरोधक म्हणतात ७० वर्षात काँग्रेस पक्षाने काय केले असे विचारतात. आपण आदरणीय डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे पाहावे, आदरणीय लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे व पहावे, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडे पाहावे आणि १० वर्षात भाजपने व संभाजी पाटील निलंगेकर यांनी काय केले हे सुद्धा पाहावे. देवणीच्या देवणी वळू असताना येथील होणारे संशोधन केंद्र परळीला या भाजपने नेले, असे म्हणत महाविकास आघाडी सरकार राज्यात येताच परळी येथील देवणी संशोधन केंद्र पुन्हा देवणी या ठिकाणी आणले जाईल असे माजी मंत्री देशमुख यांनी आश्वासन दिले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, येणाऱ्या काळात आधुनिक तंत्र शुद्ध शेतीसाठी जे काही लागेल ती मदत करणे, कृषीमाला वरील जिएसटी मागे घेणे, शेतमालाला स्वामिनाथन आयोग शिफारशीनुसार भाव देणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल.गेल्या दहा वर्षात नदीजोड प्रकल्प राबविण्यात आला नाही, रेल्वे आणता आली नाही, सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार देऊ शकले नाहीत, देवणी बसस्थानक बांधकाम पूर्ण करू शकले नाहीत, घरकुल योजना राबवू शकले नाहीत आणि आमच्यावर बोलतात.

डॉ. शिवाजी काळगे सर्वसामान्य घरातील उच्च शिक्षित डॉ. शिवाजी काळगे हे लातुर पॅटर्नचे मूळ असून सर्वसामान्य घरातील उच्च शिक्षित, एक आपला माणूस आता आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरीता संसदेत पाठवायचा असून आपण अंग झटकून कामाला लागावे. पक्ष फोडणारे आता घर फोडू लागले असून एकाने स्थापन केलेला पक्ष निवडणूक आयोग दुसऱ्याला देत आहे यामुळे आम्ही येणाऱ्या ७ मे ला लोकन्यायालायत न्याय मागण्यासाठी येत असून आपण सर्व मतदार यावेळी न्यायाधीशाच्या भूमिकेत आहात आणि आम्हाला विश्वास आहे, जनतेच्या न्यायालयात योग्य निकाल लागेल असे आमदार देशमुख यांनी सांगीतले.

सर्व्हेक्षण अहवालात महाविकास आघाडीला सर्वाधिक
जागा मिळतील असा अहवाल पूढे बोलतांना आमदार देशमुख म्हणाले, आरक्षण विषयावर विद्यमान सरकारने आपली फसवणूक केली असून यासाठी जात निहाय जनगणना करावी लागेल आणि लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळावा यासाठी प्रयत्न, महिलांच्या
सुरक्षेसाठी कठोर कायदा व ५० टक्के आरक्षण, महिला असो की पुरुष आपल्या मनरेगा मजुरीत दुपटीने वाढ करण्याची ग्यारंटी इंडिया आघाडी व आपले नेते राहुल गांधी यांनी दिली असून आजवरच्या विविध सर्व्हेक्षण अहवालात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असा अहवाल आलेला असून सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडीला मिळाव्यात यासाठी आणखी अधिक कामाला लागावे आणि आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्यावर देवणी तालुक्यातून मतांचा पाऊस पाडावा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित सर्वांना केले.

भाजप एक विशिष्ट पंथ आहे आपण सर्वधर्म समभाव मानणाऱ्या
काँग्रेस महाविकास आघाडीच्या पाठिशी राहावे मल्लिकार्जुन मानकरी यावेळी बोलताना मल्लिकार्जुन मानकरी म्हणाले की, सद्याची निवडणूक गोरगरीब जनता, महिला, बेरोजगार युवक, शेतकरी यांच्या हितासाठी विचार करून निर्णय घेण्याची निवडणूक असून मागील काळात शेतमालाला बाजारभाव दिला नाही, उच्च शिक्षित युवकांना नौकार्या दिल्या नाहीत, महिला सुरक्षित नाहीत अशी परिस्थिती देशात असून ही परिस्थिती सुधारायची आहे आणि भाजप हा पक्ष नसून एक विशिष्ट पंथ आहे यामुळे आपण सर्वधर्म समभाव मानणाऱ्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या पाठिशी राहावे आणि बहुमताने आपले उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे असे आवाहन केले.

 आपले प्रश्न सोडवीणारा २४ तास उपलब्धअसणारा लोकप्रतिनिधी हवा डॉ शिवाजी काळगे यावेळी बोलताना डॉ शिवाजी काळगे म्हणाले की, लोकसभा निवडणूक २०२४निमित्ताने आज आपण या जाहीर सभेच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र आलो आहोत.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महिनाभरापासून आम्ही प्रचाराच्या निमित्ताने मतदार संघात फिरत आहोत. विद्यमान सरकारने मागील १० वर्षात शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाहीत. शेतकऱ्यांना मदत करणे दूर उलट शेतीवर अतिरिक्त कर लावून शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. आपल्या काँग्रेस पक्षाचे इंडिया आघाडी सरकार सत्तेत आल्यास महिला,युवक, शेतकरी,बेरोजगार तरुण यांच्या करिता आपले ग्यारंटी कार्ड प्रकाशित केले असून आपण यावर विचार करायला हवा. आपल्याकडं निवडून आल्यानंतर न फिरकणारा लोकप्रतिनिधी आपल्याला हवा की मग आपले प्रश्न सोडवीणारा २४ तास उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी हवा याचा विचार करून आपले मतदान रुपी दान देऊन सेवेची संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार ) गटाचे उपाध्यक्ष अमर मोरे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.

यावेळी निरीक्षक संतोष देशमुख, मल्लिकार्जुन अप्पा मानकरी, अशोकराव पाटील निलंगेकर, लिंबन महाराज रेशमे, अभय साळुंके, संजय शेटे, शोभाताई बेंजरगे,डॉ. अरविंद भतांबरे, गोविंद गोकने, कीर्ती बेळकूने, वैजनाथ लुल्ले, हकीम शेख, लक्ष्मणराव मोरे, दिलीपराव पाटील नागराळकर, चंदन पाटील, भगवान पाटील, अजित माने, मुकेश सुडे, मकबूल वलांडीकर, विलास माने,दयानंद चोपणे,हरिभाऊ गायकवाड, अंगदराव सुर्यवंशी, रोहित बनसोडे, व्यंकटेश पुरी, अविनाश रेशमे, हरिराम कुलकर्णी यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी,सदस्य, महिला भगिनी, युवक, व्यापारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]