औसा प्रतिनिधी
औसा येथील हिरेमठ संस्थांनचे मार्गदर्शक डॉ. शांतवीर लिंग शिवाचार्य महाराज यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. जानेवारी 2023 मध्ये श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे भव्य दिव्य कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी हिरेमठ संस्थांनचे मार्गदर्शक डॉ. शांतिवीर लिंग शिवाचार्य महाराज तसेच श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथील पिठाचे श्रीमद जगद्गुरु श्री. श्री. श्री. 1008 डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य महास्वामीजी, केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यक्रमाचे रीतसर निमंत्रण देण्यात आले.
याप्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हिरेमठ संस्थांनचे शांतविरलिंग शिवाचार्य महाराज यांनी सुमारे 20 मिनिट चर्चा केली. लिंगायत समाजाच्या विविध समस्या तसेच देशातील विविध घडामोडी वर सविस्तर चर्चा करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथील हिरेमठ संस्थानचे मार्गदर्शक डॉ. शांतिवीरलिंग शिवाचार्य महाराज यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना निवासस्थानी भेटीसाठी 20 मिनिट वेळ दिल्यामुळे औसा येथील संस्थांनच्या शिष्यगणा सह वीरशैव समाजातील कार्यकर्त्यांमध्ये कौतुक होत आहे.