इचलकरंजीत पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
इचलकरंजी; ( प्रतिनिधी )—जय जय विठ्ठल,जय हरी विठ्ठल असा हरिनामाचा गजर करत भक्तीपूर्ण वातावरणात तल्लीन होत विठ्ठल – रुक्मिणी व संत ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन घेवून भाविकांनी आज रविवारी सर्वच ठिकाणी आषाढी एकादशीचा सोहळा अमाप उत्साहात साजरा केला.यानिमित्ताने इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरातील विठ्ठल मंदिर ,आमराई रोड परिसरातील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर , थोरात चौकातील विठ्ठल मंदिर यासह विविध ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासूनच भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम व अभंग – भक्तीगीताने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
दरवर्षी आषाढी व कार्तिक एकादशीला पंढरपूर पायी दिंडीची वारकरी संप्रदायाची परंपरा चालत आहे.ती आजही कायम आहे.यंदाही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पायी दिंडीसाठी अनेक वारकरी गेले आहेत.यानिमित्ताने
वारक-यांसह भाविकांना भजन , कीर्तन व प्रवचनासह विविध धार्मिक कार्यक्रमांची मोठी पर्वणी लाभत असते.यातून काही काळासाठी का असेना भाविकांना संसाराच्या तापातून सुटका होवून परमानंदाची अनुभूती घेवून पुन्हा नव्या दमानं जगण्याची उर्मी भेटत राहते.म्हणूनच आषाढी एकादशी सोहळ्याचे वेगळे महत्व कुणालाच नजरेआड करता येत नाही.यंदाच्या वर्षी देखील आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त विविध ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
इचलकरंजी येथे आज रविवारी पहाटेपासूनच गावभाग परिसरातील विठ्ठल मंदिर ,आमराई रोड परिसरातील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर , थोरात चौकातील विठ्ठल मंदिर यासह विविध ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासूनच भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.यानिमित्त श्रींची विधीवत पूजा – अर्चा ,आरती ,प्रसाद वाटप यासह भजन , किर्तन व प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम होवून या सोहळ्याला वेगळीच रंगत चढली होती.विशेष म्हणजे जय जय विठ्ठल,जय हरी विठ्ठल असा हरिनामाचा गजर करत भक्तीपूर्ण वातावरणात तल्लीन होत विठ्ठल – रुक्मिणी व संत ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन घेवून भाविकांनी आषाढी एकादशीचा सोहळा अमाप उत्साहात साजरा केला.एकंदरीत ,मंदिर परिसरात भक्ती संगीत , भाविकांच्या मुखी विठू नामाचा गजर व अमाप उत्साह पाहता वातावरणात वेगळेच चैतन्य अनुभवायला मिळाले .
या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पुजेचे व फराळाचे साहित्य विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते.तसेच भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेवून काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्यामुळे अगदी शांततेत विठ्ठल – रुक्मिणी व ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेवून घरी परतणा-या भाविकांच्या चेह-यावर वेगळाच आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले.हा सारा मंञमुग्क्षध क्षण आषाढी एकादशी सोहळ्याचे महत्व अधोरेखित करणारा ठरला.