32.1 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeदेश विदेश*हमीभाव, क्रॉप पॅटर्नसाठी केंद्राकडून स्थापन समितीत पाशा पटेल यांचा समावेश*

*हमीभाव, क्रॉप पॅटर्नसाठी केंद्राकडून स्थापन समितीत पाशा पटेल यांचा समावेश*


*शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करू- पाशा पटेल* 

शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. पिक मालाला हमीभाव आणि अन्य मुद्द्यांवर नव्याने स्थापन करण्यात समिती शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे धोरण आपल्याला प्राधान्य देणार असल्याने, शेतकरी हा खऱ्या अर्थाने राजा बनणार आहे. ही समिती नैसर्गिक शेतीवरही भर देणारा असल्याने जनतेला विषमुक्त अन्नधान्य मिळेल. केंद्र सरकारने या समितीवर संधी दिली, हे मी माझे भाग्य समजतो, असे सांगून पाशा पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.


*लातूर/प्रतिनिधी*- शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदी सरकारकडून सातत्याने प्रयत्न होत असून, त्याचाच एक भाग म्हणून कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एमसपी अर्थात किमान आधारभूत किंमत, दुष्काळी परिस्थितीसह बदलत्या वातावरणाच्या अनुषंगाने आणि देशाच्या बदलत्या गरजांनुसार पीक पद्धतीत बदल म्हणजेच क्रॉप पॅटर्न शेतीसाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, शेतकरी, कृषी वैज्ञानिक, कृषी अर्थ तज्ञ, राष्ट्रीय कृषी पुरस्कार विजेते आदी 16 मान्यवरांची एक समिती स्थापन केली असून, त्यात शेतकरी प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा पर्यावरण अभ्यासक, बांबू लागवड चळवळीचे प्रणेते पाशा पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे.    

  शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे यादृष्टीने सदर समिती घटित करण्यात आली आहे. हमीभाव अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. माजी कृषी सचिव संजय अग्रवाल यांना या समितीचे अध्यक्ष असून, सदस्य म्हणून नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद, कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. सी. एस. सी. शेखर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिकडेव्हलपमेंट), डॉ. सुखपाल सिंग (आयआयएम अहमदाबाद), राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेतकरी भारतभूषण त्यागी, शेतकरी सहकार/गटाचे प्रतिनिधी दिलीप संघानी (अध्यक्ष इफको) श्री विनोद आनंद, कृषी विद्यापीठ/संस्थेचे वरिष्ठ सदस्य डॉ. पी. चंद्रशेखर (महासंचालक, राष्ट्रीय कृषी विस्तार संस्था (व्यवस्थापन), डॉ. जे. पी. शर्मा (कुलगुरू, शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, जम्मू) आधी महान व्यक्तिमत्त्वांचा शेतकरी प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातून पाशा पटेल यांचा यांचा समावेश करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वीच पाशा पटेल यांचा केंद्र सरकारच्या व्यापार मंडळावर समावेश करण्यात आला होता. महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून पाशा पटेल यांनी उत्कृष्ट कार्य करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. त्यांचा हा अनुभव विचारात घेता, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे घटक हमीभाव, बदलत्या वातावरणाानुसार क्रॉप पॅटर्न राबविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या केंद्राच्या समितीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवय्ये नेते म्हणून ख्याती असलेले पाशा पटेल यांच्यावर केंद्र सरकारने गेल्या आठ दिवसात दोन मोठ्या जबाबदाऱ्या सोपवून एक प्रकारे त्यांनी केलेल्या कार्याची पावती दिली असून, शेतकऱ्यांचा सन्मान वाढविला आहे. 

   ही समिती देशातील शेतकऱ्यांसाठी एमएसपी मिळण्याची व्यवस्था अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्याच्या सूचना करून कृषी खर्च आणि किमती आयोगाला अधिक स्वायत्तता देण्याची व्यवहार्यता आणि ते अधिक वैज्ञानिक बनवण्यासाठी उपाययोजना करेल. सोबतच कृषी पणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी व्यवस्था, देशाच्या बदलत्या गरजांनुसार देशांतर्गत आणि निर्यातीच्या संधींचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून देणे, झिरो बजेट व नैसर्गिक शेतीवरही समिती काम करणार आहे. कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन आणि विकास संस्था, विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्थांतील नैसर्गिक शेतीप्रणाली अभ्यासक्रम ज्ञान केंद्र बनवण्यासाठी धोरणे सुचवणार आहे.

ReplyForward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]