*हभप ढोक महाराजांचे कीर्तन*

0
424

ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या कीर्तनात भाविक-भक्त मंञमुग्ध

निलंगा,-( प्रशांत साळुंके )- निलंगा तालुक्यातील निटूर येथील स्व.विश्वनाथराव गंगणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांचे सुश्राव्य कीर्तनसेवा पार पडली.त्यात,त्यांनी जन्म आणि मृृत्यु ढरलेला आहे तरी माणसाने जीवन जगत असताना विचारपूर्वक जगणे ही काळाची गरज असल्याचे कीर्तनसेवेच्या प्रारंभी सांगितले.

ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांनी कीर्तनसेवा केली.त्यांनी संयोजक बालाजी गंगणे,निळकंठ गंगणे,प्रसाद गंगणे यांची स्तुती करताना म्हणाले,स्व.विश्वनाथराव गंगणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तनसेवा ठेवली या तिन्ही मुलांसाठी पुण्याईचा दिवसअसल्याचेही यावेळी नमुद केले.तसेच,उत्तमरित्या व्यासपीठ आणि भाविक-भक्तांसाठी आसनव्यवस्था चांगल्या पध्दतीने नियोजन केल्याने या तिघांची स्तुती भरभरून केली.

याप्रसंगी,विरयोध्दा संघटनेचे श्रीकांत रांजणकर,दिनकर निटूरे,राजाभाऊ तापडीया,विजयकुमार देशमुख,राजकुमार सोनी,सतिश शिंदे,प्रसाद बुरकूले,नंदकुमार हासबे,नंदकुमार कुलकर्णी,उत्तम नागभुजंगे,रमेश नागभुजंगे आणि एस.एस.सी.1994 च्या बॅचचे गणी शेख,पदमाकर निटूरे,प्रशांत साळुंके,संतोष सोमवंशी,विजयकुमार डांगे,बालाजी सोमवंशी,सुधाकर नागभुजंगे,धोंडीराम सोळुंके आदी जणांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here