श्रावणमासाचे अनुष्ठान म्हणजे
आयुष्यातील एक सुवर्णसंधीच
हभप ज्ञानराज महाराज
संतवाणी. दि.6.
औसा; (शामराव कुलकर्णी याजकडून )
….…………………………………..
श्रावणमासाचे सद्गुरु परंपरेचे हे श्रावण मास अनुष्ठान म्हणजे भक्ताच्या आयुष्यातील एक सुवर्णसंधीच या सुवर्णसंधीचा उपयोग करून घेऊन आपली जीवन आनंदी आणि सुखमय बनवले पाहिजे आनंद आणि सुख हे इथेच आहे असे विचार ह भ प श्री ज्ञानराज गुरुबाबा महाराज यांनी व्यक्त केले.
पहिल्या श्रावण सोमवारी श्रावण अनुष्ठानाच्या प्रथम दिनी पिठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या आज्ञेवरून श्रावण मास अनुष्ठानातील सायंकाळी नित्य होणाऱ्या चक्रीभजन उपासनेनंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी वरील चिंतन मांडताना ज्ञानराज महाराज बोलत होते
अनुष्ठान म्हणजे हे साधे नाही हे घडायला देखील भाग्यच लागते पुण्याईची झोळी घेऊन भक्ती अमृताचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आम्ही इथे जमलो आहोत संपूर्ण एक महिना श्रावणात ही साधना आपल्या गुरुगादी चरणी रुजू करायची आहे
सत्कर्म नामस्मरण सत्संग जपपूजन अशा पुण्यप्राप्तीची झोळी घेऊन आपण देवाच्या सन्मुख आलो आहोत कारण पुण्याची कायम टिकते जी सत्कर्माच्याच खांबावर टिकून राहते ती साधना ते सत्कर्म आपल्या हातून घडावे हीच परमात्मा पांडुरंग आणि गुरुचरणी आपली विनम्र प्रार्थना असेल.
आज प्रथम दिवस सोमवार आणि श्रावण अनुष्ठानाच्या सांगता देखील सोमवारीच होत आहे हा योगायोग असून वृत्तीचे बीज क्रियेमध्ये आहे जशी तुमची वृत्ती, बुद्धी तशी क्रिया घडते म्हणून वृत्तीवर स्थिर होण्यासाठी ही साधना जरुरीची असल्याचे श्री ज्ञानराज महाराज म्हणाले
आज श्रावणानुष्ठानाच्या पहिल्या दिवशी माळी समाज, कांबळेवाडी कर आणि पांढरी येथील शिष्यांची माळसेवा त्यांनी अत्यंत श्रद्धापूर्वक गुरु दरबारी रुजू केल्याचे महाराज म्हणाले.
दिवसभर श्रावणमासाचे
नित्यनेम व कार्यक्रम
……………….,……..
सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात आणि सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनात यंदाच्या श्रावण अनुष्ठानास सोमवारी आरंभ झाला पहाटे काकडा , नित्य पुजा,
श्री स्वयंभू विठ्ठल आणि सद्गुरु समाधीना रुद्राभिषेक महापूजा तर नंतर आरती नैवेद्य महाप्रसाद पंगती दुपारी दोन ते चार महिलांचे बैठकी भजन चार ते सहा पुरुष भजनी मंडळाचे बैठकी भजन ठीक सहा वाजता श्री स्वयंभू विठ्ठलाची धुपारती नंतर 7.30 ते 9 परंपरेचे प्रासादिक चक्रीभजन नंतर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वरील निरूपण आणि रात्री हरीजागर असा भरगच्च नामसंकीर्तनाचा जल्लोष श्रावणानुष्ठानात सुरू झाला आहे
आपली पिढ्यानपिढ्यापासून असणारी सेवा सर्व दूर असणारे सर्व शिष्य तसेच गावातील पेठकर आणि कसबे कर यांची माळ सेवा या श्रावण महिन्यात नाथ मंदिरात गुरु दरबारी रुजू होते.