29 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमनोरंजन*हंगामा सादर करत आहे खिळवून ठेवणारी मर्डर-मिस्ट्री सिरीज मौका या धोका*

*हंगामा सादर करत आहे खिळवून ठेवणारी मर्डर-मिस्ट्री सिरीज मौका या धोका*

लातूर , २१ जून २०२३ : देशातील नामवंत आणि आघाडीचा मनोरंजन मंच असलेल्या हंगामाने एक अत्यंत थरारक आणि खिळवून ठेवणारी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणली आहे. मौका या धोका असं या मालिकेचे शीर्षक असून ही मर्डर मिस्ट्री धाटणीची मालिका असणार आहे. या मालिकेसाठी उत्तम कलावंताची फौज एकत्र आली असून यामध्ये हिमांशू मल्होत्रा, आभास मेहता, समीक्षा भटनागर यांचा समावेश आहे. या तिघांनीही या मालिकेतील पात्र अक्षरश: जिवंत केली आहेत. आयुष्यातील आवडी आणि इच्छा माणसाला कोणत्या थरापर्यंत नेतात हे या मालिकेमध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अमित नावाच्या व्यक्तिरेखेभोवती मौका या धोका ही सिरीज फिरते. अमित हा सर्वसामान्य माणूस दाखवण्यात आला आहे. मात्र अमितच्या मनातील इच्छा त्याला अत्यंत भयानक वळणावर आणून सोडतात. अमित हा एका खुनाचा कटात खेचला जातो. खुनाच्या रहस्यामागील सत्य शोधून काढण्याच्या अमितच्या प्रवासात गूढ व्यक्तिमत्वाच्या शालिनीची साथ मिळते. शालिनी ही देखील या खुनाच्या कटाच्या फेऱ्यात अडकलेली असते. या सगळ्या खुनाच्या प्रकरणावर आणखी एक व्यक्ती डोळा ठेवून असते ती म्हणजे सत्यजीत. सत्यजीतची व्यक्तिरेखा ही या सगळ्याचा सूत्रधार असावी असा संशय अनेकांना असतो. अमितला आता या भीषण खेळातून आपली सुटका करून घेणं आणि या सगळ्या कटामागील सत्य बाहेर काढणं हे अत्यंत गरजेचं असतं. तो ते कसं करतो हे या मालिकेतून दाखवण्यात आलं आहे.

या शोबद्दल बोलताना हंगामा डिजिटल मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ )सिद्धार्थ रॉय म्हणाले की प्रेक्षकांची बदलत जाणारी आवड ओळखून त्यानुसार वैविध्यपूर्ण आणि आवडणाऱ्या मनोरंजनाचा खजिना उपलब्ध करून देणं हे हंगामाचे सातत्याने उद्दीष्ट राहिलेले आहे. मौका या धोका ही असंख्य उत्कंठावर्धक आणि रहस्याचा शेवटपर्यंत खुलासा न होणारी सिरीज आहे. उत्तम कथानक, तगडे कलाकार यामुळे ही सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी बनली आहे. प्रेक्षकांना उत्तम मनोरंजनाद्वारे खिळवून ठेवणे हे हंगामाचे उद्दीष्ट्य असून ही मालिका देखील त्याला अपवाद नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]